होली हैं.. असे म्हणून आपण सगळे काही सर्वाना माफ करतो, पण या वेळी महाराष्ट्रात दुष्काळ असताना पाण्याचा असा गैरवापर करणाऱ्यांना कुणीही शहाणा नागरिक माफ करणार नाही. खुद्द सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी होळी व रंगपंचमीनिमित्त त्यांच्या चाहत्यांना पाण्याचा वापर टाळून कोरडी होळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर अमिताभने हे आवाहन केले आहे. ट्विटरवर पाठवलेल्या संदेशात अमिताभ यांनी असे आवाहन केले आहे, की होळी खेळा, पण पाण्याचा वापर करू नका. कारण राज्यात खूप तीव्र दुष्काळ आहे. गेल्या चाळीस वर्षांत असा दुष्काळ पडला नव्हता. महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे व आताशी कुठे मार्च महिना आहे. उन्हाळय़ात काय होईल याचा विचार करा. पाणी वाचवा, कोरडी होळी खेळा. अभिनेता हृतिक रोशन व रितेश देशमुख यांनीही याच भावना व्यक्त केल्या आहेत. हृतिकने या वर्षी महाराष्ट्रातील दुष्काळामुळे होळी खेळायची नाही असे ठरवले आहे. तो केवळ शुभशकुन म्हणून केवळ गुलालाचा टिळा लावणार आहे. अभिनेता रितेश देशमुख व रणवीर शोरी यांनी म्हटले आहे, की महाराष्ट्रातील दुष्काळ फार गंभीर आहे, पाणी वाचवणे ही काळाची गरज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे व आताशी कुठे मार्च महिना आहे. उन्हाळय़ात काय होईल याचा विचार करा. पाणी वाचवा, कोरडी होळी खेळा..
अमिताभ बच्चन</strong>

महाराष्ट्रात पाणीटंचाई आहे व आताशी कुठे मार्च महिना आहे. उन्हाळय़ात काय होईल याचा विचार करा. पाणी वाचवा, कोरडी होळी खेळा..
अमिताभ बच्चन</strong>