दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट विजय मिळवला आहे. एकूण ३५ जागांवर अण्णाद्रमुकचे उमेदवार आघाडीवर आहेत. गेल्यावेळी चांगली कामगिरी करणाऱया द्रमुकचा केवळ एकच उमेदवार राज्यात सध्या आघाडीवर आहे.
कर्नाटकमधूनही भाजपच सर्वाधिक जागा जिंकणार पक्ष ठरला आहे. राज्यातील २८ जागांपैकी १५ जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर राज्यात सत्तेवर असणाऱया कॉंग्रेसचे केवळ ११ उमेदवारच आघाडीवर आहेत. धर्मनिरपेक्ष जनता दलाचे २ उमेदवार राज्यात आघाडीवर आहेत.
देशात बुडण्याच्या स्थितीत असलेल्या कॉंग्रेसला केरळने सावरले आहे. राज्यातील २० जागांपैकी नऊ जागांवर कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.
आंध्र प्रदेशातील १६ जागांवर तेलगू देशम पक्षाचे तर ११ जागांवर तेलंगणा राष्ट्रसमितीचे उमेदवार आघाडीवर आहेत.
तामिळनाडूत अम्मांची विजयी घोडदौड; कर्नाटकातही भाजपची हवा
दक्षिणेतील तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुक पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट विजय मिळवला आहे.
First published on: 16-05-2014 at 11:35 IST
TOPICSजयललिताJayalalithaaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amma wave in tn bjp gets foot in door in kerala