खालिस्तानी समर्थक आणि ‘वारिस दे पंजाब’चा सर्वेसर्वा अमृतपाल सिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून पोलीस अमृतापाल सिंगच्या मागावर आहेत. अशातच अमृतपाल सिंगचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात पोलिसांना चकवा देण्यासाठी अमृतपाल सिंग एका कारमधून उतरत दुचाकीवरून पळून जाताना दिसत आहे. पोलीस अमृतपाल सिंगचा तपास घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतपाल सिंग आपल्या मर्सिडीज कारमधून जालंधरच्या शाहकोट येथे उतरला. तेथून आपल्या सहकाऱ्यांसह ब्रिझाकारमध्ये बसला. तिथे अमृतपाल सिंगने आपले कपडे बदलले. पहिल्यांदा अमृतपाल सिंगने निळी पगडी घातली होती. त्यानंतर केशरी पगडी घालून दोन सहकाऱ्यांसह दुचाकीवरून पळून गेला.

अमृतपाल सिंगला पळून जाण्यास मदत करणाऱ्याचं नाव पप्पलप्रीत सिंग सांगितलं जात आहे. तो अमृतपाल सिंगचा जवळील सहकारी असल्याचं बोललं जातं. तसेच, त्याचं आयएसआयएस या दहशतवादी संघटनेबरोबर संबंध होते. पप्पलप्रीत सिंग हा पत्रकारही राहिला आहे.

दरम्यान, अमृतपाल सिंग प्रकरणावरून पंजाब उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारलं आहे. उच्च न्यायालयाने म्हटलं की, “पंजाब पोलिसांचे ८० हजार कर्मचारी आहे. तरीही अमृतपाल सिंग फरार कसा? तुमचे ८० हजार पोलीस काय करत आहेत? अमृतपाल सिंग फरार कसा झाला?,” अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पंजाब पोलिसांना खडसावालं आहे.