पंजाब पोलीस ज्याचा कसून शोध घेत आहेत, त्या अमृतपाल सिंगबाबत दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. त्याच्या एकेक सहकाऱ्याला अटक केली जात आहे. त्यांच्याकडून अमृतपाल सिंगच्या ठावठिकाण्याबाबत वेगवेगळी माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत आहे. आत्तापर्यंत त्याचे सात वेगवेगळ्या लुकमधले फोटो पोलिसांनी जाहीर केले आहेत. अजूनही अमृतपाल सिंग पोलिसांच्या हाती लागत नसताना त्याचा एक नवीन फोटो सध्या व्हायरल होऊ लागला आहे. हिंदुस्तान टाईम्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. अमृतपाल सिंग या फोटोमध्ये इतका निवांत दिसतोय, की पंजाब पोलीस ज्याच्या मागे हात धुवून लागलेत, तो हाच का? असाच प्रश्न कुणालाही पडावा!

गेल्या १० दिवसांपासून पंजाब पोलीस अमृतपाल सिंगच्या मागावर आहेत. जलंधरमध्ये पोलिसांनी त्याचा काही किलोमीटरपर्यंत पाठलागही केला होता. पण तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा करण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून फक्त अमृतपाल सिंग कुठे आहे, याविषयी अफवा कानावर येत आहेत. तो कुठे आहे, याची नेमकी माहिती जरी पोलिसांना मिळाली, तरी ती मिळेपर्यंत अमृतपाल सिंगनं पोबारा केलेला असतो.

Shocking viral video of child dangerous play with washing machine goes viral people are in shock
VIDEO: बापरे! चिमुकला खेळताना वॉशिंग मशीनमध्ये गेला, दुसऱ्याने प्लग सुरू केला; पुढं जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
While running in the police recruitment field, two young women clashed, pulled each other's clothes shocking video viral
“अगं काहीतरी भान ठेवा” पोलीस भरतीच्या मैदानात धावतानाच दोन तरुणी भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या अन् शेवटी…VIDEO व्हायरल
Fact check video AI-generated video shared as that of Indian PM Modi's residence
सोन्याचं बाथरुम, २५ कोटींचा बेड; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलिशान घरातील VIDEO होतायत व्हायरल? जाणून घ्या काय आहे सत्य
Wamik Karad Audio Clip
“इथं बीड जिल्ह्याचा बाप बसलाय”, वाल्मिक कराडची आणखी एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; पोलीस अधिकाऱ्याला म्हणाला…
Techies Bengaluru traffic meeting idea is a hit online
ट्रॅफिकमध्ये अटेंड करता येईल ऑफिस मिटिंग? Viral Photo पाहून सुचला भन्नाट जुगाड, नेटकऱ्यांना प्रंचड आवडली कल्पना
young Chennai photographer was cheated for 13 lakh after being lured for shoot in Pune and Goa
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला
Little Girl first train journey
‘हे काय नवीन आता?’ मुंबई लोकलमधून चिमुकलीचा पहिला प्रवास; गर्दी पाहून कसे दिले हावभाव? नक्की बघा VIDEO

दरम्यान, आता अमृतपाल सिंगचा एक नवीन फोटो व्हायरल झाल्यामुळे तो नेमका कुठे आहे याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो नेपाळला असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यामुळे नेपाळ पोलिसांना त्यासंदर्भात कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली होती. मात्र, पंजाबमधील त्याच्या काही फोटोंमुळे त्याच्या ठावठिकाण्याविषयी पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

amritpal singh (1)
अमृतपाल सिंगचा व्हायरल फोटो!

नवा फोटो, नवा लुक!

याआधी अमृतपाल सिंगचे सात लुक पोलिसांच्या दफ्तरी नोंद असताना एक नवा लुक समोर आला आहे. यामध्ये अमृतपाल सिंग एका ट्रकच्या मागे बसल्याचं दिसत आहे. यात त्याच्या डोक्यावर मरून रंगाची पगडी, डोळ्यांवर गॉगल, हातात बीअरचा कॅन आणि अंगात स्वेटशर्ट दिसत आहे. हा फोटो नेमका कधीचा आहे, याविषयी संभ्रम असला, तरी तो ताजा असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या फोटोवरून हा खरंच वाँटेड आहे का? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.

अमृतपाल सिंगचे सात लुक; पंजाब पोलीसही चक्रावले, पुन्हा रुप बदलल्याचा व्यक्त केला संशय!

फोटोत अमृतपालशेजारी त्याचा मार्गदर्शक?

दरम्यान, या फोटमध्ये अमृतपालशेजारी त्याचा मार्गदर्शक पापलप्रीत सिंग बसल्याचं दिसत आहे. पापलप्रीत सिंग याच्यावर पाकिस्तानमधील आयएसआय गुप्तचर संघटनेच्या संपर्कात असल्याचा आरोप आहे. यासोबतच त्या दोघांचा अजून एक फोटो समोर आला असून त्यात अमृतपाल आणि पापलप्रीत हे एका तीनचाकी बाईकवर बसल्याचं दिसत आहे. फरार होण्यासाठी याच बाईकचा त्यांनी वापर केला असावा, असाही संशय आहे.

Story img Loader