खलिस्तान समर्थक आणि ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंगचा मार्च २०२३ पासून पोलीस शोध घेत होते. अखेर रविवारी ( २३ एप्रिल ) अमृतपाल सिंगने पंजाबातील मोगा जिल्ह्यात आत्मसमर्पण केलं आहे. याबाबत पंजाब पोलिसांनी ट्विट करत पुष्टी दिली आहे. पंजाब पोलीस अमृतपाल सिंगला घेऊन आसाममधील डिब्रूगढ येथे जात आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पंजाब पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

अमृतपाल सिंगवर काय आहे आरोप?

अमृतपाल सिंगवर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल आहे. त्याशिवाय खून आणि अपहरण यासह अनेक गुन्हे दाखल त्याच्यावर दाखल आहेत. यातील दोन प्रकरण हे अमृतसरमधील अजनाला पोलीस ठाण्यातील आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
syria civil war marathi news
सीरियातील अचानक सत्ताबदलाने कुणाला काय मिळणार? रशिया-इराणचे नुकसान कसे? तुर्कीये-इस्रायलचा फायदा कसा?
challenges in front of Syria
सीरियातील आव्हाने संपणार कशी?
dubai visa policy
दुबईचा व्हिसा मिळवताना भारतीय पर्यटकांना अडचणी का येत आहेत? काय आहेत नवे नियम?
Eknath Shinde On Maharashtra Karnataka Border Dispute :
Eknath Shinde : “कर्नाटक सरकारचा दडपशाहीचा प्रयत्न”, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Green chillies from Vidarbha, Green chillies,
विदर्भातील हिरवी मिरची थेट दुबईच्या बाजारात
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

हेही वाचा : अग्रलेख: अमृतकालातील विषवल्ली

झालं असं की, अमृतपाल सिंगचा सहकारी लवप्रीत सिंगला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर २३ फेब्रुवारी २०२३ ला अमृतपाल आपल्या समर्थकांसह तलवारी आणि बंदुका घेऊन लवप्रीत सिंगची सुटका करण्यासाठी अजनाला पोलीस ठाण्यात गेला होता. तेव्हा समर्थकांनी पोलीस ठाण्यावर हल्ला करत गोंधळ घातला. यात अनेक पोलीस जखमी झाले होते. अखेर दबावाखाली येत पोलिसांनी लवप्रीत सिंगच्या सुटकेचं आश्वासन दिलं. तेव्हापासून अमृतपाल सिंग पोलिसांच्या निशाण्यावर होता.

अमृतपाल सिंग कोण आहे?

पंजाबातील जल्लूपुर गावातील रहिवासी असलेल्या अमृतपाल सिंगने १२ पर्यंत शिक्षण घेतलं आहे. २०१२ साली अमृतपाल सिंग दुबईला गेला होता. तिथे त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. मागील वर्षी शिवसेना नेते सुधीर सूरी खून प्रकरणात अमृतपाल सिंगचे नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अमृतपाल सिंगला सिंगावाला गावात नजरकैदेत ठेवलं होतं.

ब्रिटनमधील मुलीशी लग्न

३० वर्षीय अमृतपाल सिंगचं लग्न झालं आहे. यावर्षी १० फेब्रुवारीला ब्रिटेनमध्ये राहणारी एनआरआय किरणदीप कौर हिच्याशी अमृतपाल सिंगने लग्न केलं होतं. किरणदीप कौर ही मुळची जालंधरमधील कुलारा गावाची रहिवाशी आहे. पण, अनेक वर्षापासून तिचे कुटुंबीय इंग्लंडमध्ये वास्तव्य करत आहेत.

…अन् अमृतपाल सिंग ‘वारिस पंजाब दे’ सर्वेसर्वा झाला

‘वारिस पंजाब दे’ या संघटनेची स्थापन गायक दीप सिद्धू याने केली होती. शेतकरी आंदोलनावेळी लाल किल्ल्यासमोर निदर्शन केल्यानंतर दीप सिद्धू चर्चेत आला होता. पण, १५ फेब्रुवारी २०२२ ला रस्ते अपघतात दीप सिद्धूचा मृत्यू झाला. पण, दुबईवरून आल्यावर अमृतपाल सिंग हा ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख झाला. त्यानंतर संघटनेचं अधिकृत संकेतस्थळ सुरू करत लोकांना जोडण्याचं काम सुरू केलं.

हेही वाचा : अमृतपाल हरेलच, पंजाब जिंकला पाहिजे!

जर्नेलसिंग भिंद्रनवालेशी तुलना

अमृतपाल सिंगची तुलना १९८४ साली अमृतसरमधील सुवर्ण मंदिरातील कारवाईत मारल्या गेलेल्या जर्नेलसिंग भिंद्रनवालेशी केली जाते. याचं कारण अमृतपाल सिंग जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारखंच वेगळ्या खलिस्तानची मागणी करत आहे. १९८० साली भिंद्रनवालेने शिख समुदायासाठी वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. त्यानंतर पंजाबात एकच खळबळ उडाली होती. अमृतपाल सिंग जर्नेलसिंग भिंद्रनवालेसारखंच मोठी पगडी बांधत भडखाऊ भाषण करत असे.

Story img Loader