कंपनीच्या वित्तीय व्यवहारात फसवणुक केल्याबद्दल  ‘एमव्हे इंडिया’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिलियम एस पिंकने आणि दोन संचालकांना केरळ पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सुत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, अटक केलेल्या संचालकांमध्ये संजय मन्होत्रा आणि अंशु बुद्धिराजा यांचा समावेश आहे. वायनाडच्या गुन्हे शाखेमार्फत २०११ साली दाखल करण्यात आलेल्या तीन गुन्ह्यांना अनुसरून ही अटक करण्यात आले असल्याचे समजते. या तीन अधिकाऱ्यांवर ‘प्राईज चिट्स अँड मनी सर्क्युलेशन प्रतिबंध कायदा १९७८’ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
पोलिसांनी नुकतीच याच महिन्यात या तीनही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती आणि त्यानुसार त्यांना आज मंगळवार चौकशीसाठी पुन्हा बोलविण्यात आले होते. पोलिस ठाण्यात कंपनीचे हे तिनही अधिकारी चौकशीसाठी उपस्थित होते आणि पुढील चौकशी दरम्यान, सदर प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा