वायव्य पाकिस्तान प्रांतात आज (शनिवार) सकाळी जोरदार भूकंपाचे धक्के बसले.  रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ६.० इतकी मोजण्यात आली आहे. पाकिस्तानी हवामानशास्त्र विभागातील वरिष्ठ अधिकारी मोहम्मद रियाझ यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या वायव्य दिशेला असलेल्या पेशावरसह सर्वच शहरांना या भूकंपाचा धक्का बसला.
या भूकंपामुळे अद्याप कोठेही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. पाकिस्तान-अफगणिस्तान सीमेवर भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१३ मध्ये, पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भुकंपामुळे ३७६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर, अरबी समुद्रात एक नवे बेट तयार झाले होते.

Story img Loader