लंडनमध्ये ब्रिटिश सैनिकाची हत्या करणारे हल्लेखोर इस्लाम विषयक घोषणा देत होते, असे एका क्लिपमुळे दिसले आहे. दक्षिण लंडनमध्ये दोन व्यक्तिंनी ब्रिटिश सैनिकाचा शिरच्छेद केल्याची घटना बुधवारी घडली. ब्रिटन सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोघेजण जखमी झाले.
लंडन शहराजवळील वूलविच स्ट्रीट येथे ही घटना घडली. हल्लेखोर दोघेजण प्राणघातक शस्त्रे बाळगून होते. रॉयल बरॅक्स येथे काम करीत असलेल्या सैनिकावर या दोघांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर प्रत्यक्षदर्शीने केलेल्या चित्रिकरणामध्ये दोघेजण दिसत आहेत. त्यांचे हात रक्ताने माखले होते आणि हातात धारदार चाकू असल्याचे दिसते.
‘आम्ही अल्लाची शपथ घेतो, आम्ही कधीही तुमच्याबरोबरचे युद्ध थांबवणार नाही. दररोज मुस्लिमांची हत्या होते आहे म्हणून आम्ही हे कृत्य केले,’ असे ओरडताना एक तरुण कॅमेऱयात बंदिस्त झाला आहे. डोळ्यांच्या बदल्यात डोळा आणि दाताच्या बदल्यात दात या धोरणामुळेच या सैनिकाची हत्या करण्यात आल्याचे त्या व्यक्तीने ओरडून सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा