Ram Temple Inaugaration : श्री राम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार आहे. या ऐतिहासिक दिवसाची अनेक रामभक्त आतुरतेने वाट पाहत आहेत. यासाठी श्री राम जन्मभूमी ट्रस्टकडून देशभर कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यासंदर्भात देशभरात असलेल्या रामभक्तांसाठी ट्रस्टने जाहीर आवाहन केलं आहे. त्यांनी X च्या माध्यमातून हे आवाहन केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“नवीन मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात प्रभू श्री रामाच्या बालस्वरूपाच्या नवीन मूर्तीची स्थापना केली जाणार आहे. यानिमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीसुद्धा प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी (सकाळी ११ ते १ दरम्यान) तुमच्या गावात, परिसर, कॉलनी येथे असलेल्या मंदिरात शेजारच्या राम भक्तांना एकत्र करा आणि भजन-कीर्तन करा. पडदा (L.E.D. स्क्रीन) लावून अयोध्येचा अभिषेक सोहळा समाजाला दाखवा. तसंच, शंख फुंकून, घंटा वाजवून, आरती करून आणि प्रसाद वाटून आनंद साजरा करा”, असं आवाहन ट्रस्टने केलं आहे.

हेही वाचा >> अयोध्येतील राममंदिर लोकार्पण सोहळ्याचे विदर्भातील १५ लाख घरांना निमंत्रण, काय आहे विहिंपचा उपक्रम?

“कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर केंद्रित असावे, तुमच्या मंदिरात असलेल्या देवी-देवतांची भजन-कीर्तन-आरती पूजा आणि “श्री राम जय राम जय जय राम” या विजय मंत्राचा १०८ वेळा सामूहिक जप करावा. यासोबतच हनुमान चालिसा, सुंदरकांड, रामरक्षा स्तोत्र इ. तुम्ही सामूहिक पठण देखील करता येईल. सर्व देवी-देवता प्रसन्न होतील, संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल. अभिषेक सोहळा दूरदर्शनवर थेट प्रक्षेपित केला जाईल. प्राण-प्रतिष्ठेच्या दिवशी, देवांना प्रसन्न करण्यासाठी सूर्यास्तानंतर आपल्या घरासमोर दिवा लावा, दिवा सजवा, जगभर करोडो घरांमध्ये दीपोत्सव साजरा होऊ द्या”, असं आवाहन रामजन्मभूमी ट्रस्टकडून करण्यात आलं आहे.

हेही वाचा >> ‘राजीव गांधी यांनी बाबरीचे कुलूप उघडले होते’, राम मंदिराच्या श्रेयाबाबत कमलनाथ यांनी भाजपाला सुनावले

“प्रभू श्री राम लल्ला आणि नव्याने बांधलेल्या मंदिराच्या दर्शनासाठी सोयीच्या वेळी आपल्या कुटुंबासह अयोध्याजी येथे यावे आणि श्री रामजींचा आशीर्वाद घ्यावा”, असंही ट्रस्टने म्हटलं आहे.

राम मंदिराचे वैशिष्ट्यं काय आहेत?

  • पारंपारिक नगर शैलीत मंदिर बांधलेले आहे.
  • मंदिराची लांबी (पूर्व-पश्चिम) ३८० फूट, रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट आहे
  • तीन मजली मंदिर, प्रत्येक मजल्याची उंची २० फूट, एकूण ३९२ खांब, ४४ दरवाजे.
  • तळमजला गर्भगृह – भगवान श्री रामाच्या बालस्वरूपाचे देवता (श्री रामलला), पहिल्या मजल्यावरील गर्भगृह श्री राम दरबार.
  • एकूण पाच मंडप – नृत्य मंडप, रंगमंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप, कीर्तन मंडप.
  • खांब आणि भिंतींमध्ये देवी-देवतांच्या मूर्ती.
  • पूर्वेकडून ३२ पायऱ्या (उंची १६.५ फूट) चढून सिंहद्वार येथून प्रवेश मिळेल.
  • अपंग लोक आणि वृद्ध लोकांसाठी रॅम्प आणि लिफ्टची तरतूद.
  • चौफेर एक आयताकृती उद्यान (आकार) – लांबी ७३२ मीटर, रुंदी ४.२५ मीटर, उद्यानाच्या चार कोपऱ्यांवर चार मंदिरे, उद्यानाच्या दक्षिणेला भगवान सूर्य, शंकर, गणपती, देवी भगवती, हनुमान आणि अन्नपूर्णाचे मंदिर उत्तरेकडे माता.
  • मंदिराच्या दक्षिणेकडील ५ पौराणिक सीताकूप
  • परकोटाच्या बाहेर दक्षिण दिशेला महर्षि वाल्मिकी, महर्षि वशिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षी अगस्त्य, निषादराज, माता शबरी आणि देवी अहिल्या यांचे प्रस्तावित मंदिर.
  • ओम दक्षिण-पश्चिम भागात नवरत्न कुबेर माळावर वसलेल्या शिवमंदिराचा जीर्णोद्धार आणि रामभक्त जटायू राज यांच्या मूर्तीची स्थापना.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An important appeal from the trust for ram devotees around the world 12 features of ram temple know in detail sgk