नवी दिल्ली : भारत-नेपाळ सीमेवर नेपाळ पोलिसांनी तीन जणांवर केलेल्या गोळीबारात एक भारतीय जखमी झाल्याची माहिती बिहार पोलिसांनी दिली आहे. मागील काही दिवसांत नेपाळ पोलिसांनी सीमेवर केलेल्या गोळीबाराची ही दुसरी घटना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बिहारच्या किशनगंज भागातील भारत-नेपाळ सीमेवर हा प्रकार घडल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. नेपाळ पोलिसांनी तीन जणांवर गोळ्या चालवल्या. यात एक भारतीय नागरिक जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती किशनगंजच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.

महिनाभरापूर्वीच नेपाळ सशस्त्र पोलिसांनी सीतामढीनजीकच्या सीमेवर गोळीबार केला होता. त्या ठिकाणी दोन गटांत वाद सुरू असताना हा गोळीबार झाला होता. यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यूू झाला होता, तर दोनजण जखमी झाले होते.

दरम्यान, नेपाळच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीची बैठक रविवारी सातव्यांदा पुढे ढकलण्यात आली. पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांच्यात सत्तावाटपाबाबतचा समझोता घडविण्यासाठी  ज्येष्ठ नेत्यांनी अधिक जोमाने प्रयत्न सुरू केले आहेत.