Analog Space Mission : भारताच्या पहिल्या ॲनालॉग अंतराळ मोहिमेला लडाखमधील लेह येथून सुरुवात करण्यात आली आहे. इस्रोने (भारतीय अंतराळ संशोधन संस्था) या मोहिमेला सुरुवात करत भविष्यात अंतराळ मोहीमेची योजना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ॲनालॉग मिशनचा वापर करण्यात येणार आहे. ॲनालॉग मिशनचा उद्देश हा चंद्र आणि मंगळ या सारख्या मोहीमांचं निरीक्षण करणं आणि सराव करणं हा आहे.

ॲनालॉग स्पेस मिशन्स म्हणजे पृथ्वीवरील अशा ठिकाणी आयोजित केलेल्या चाचण्या ज्या भौतिकदृष्ट्या अत्यंत अंतराळ वातावरणाशी मिळतात. अंतराळ उड्डाण संशोधनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या चाचण्या महत्त्वाची भूमिका बजावतात. ॲनालॉग स्पेस मिशन्स या मोहिमेसाठी लडाखची खास निवड करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी लडाखची निवड केली गेली. यामागचं कारण तेथील भौगोलिक परिस्थिती थंड, कोरडे हवामान, नापीक जमीन आणि उंची अशा सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणाची निवड करण्यात आली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हेही वाचा : Kanpur : धक्कादायक! महिलेची हत्या करून मृतदेह ‘व्हिआयपी’ परिसरात पुरला; चार महिन्यांनी ‘असं’ उलगडलं घटनेचं रहस्य

दरम्यान, भविष्यातील ग्रहांच्या शोधासाठी वैज्ञानिक आणि अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यासाठी या ठिकाणी चाचण्या घेतल्या जाणार आहेत. याठिकाणी अंतराळयान आणि अंतराळवीर निवास तंत्रज्ञानाची चाचणी घेतली जाऊ शकते. दरम्यान, ह्युमन स्पेसफ्लाइट सेंटर, एएकेए स्पेस स्टुडिओ, लडाख विद्यापीठ, आयआयटी बॉम्बे आणि लडाख ऑटोनॉमस हिल डेव्हलपमेंट कौन्सिल यासह अनेक संस्थांच्या सहकार्याने इस्रोने हे अभियान सुरू केलं असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. ऑक्टोबरपासून सुरु झालेलं हे अभियान महिनाभर चालणार आहे. यावेळी मिशनमध्ये कॉम्पॅक्ट, इन्फ्लेटेबल वस्ती “हब-१” ची चाचणी केली जाईल. यासंदर्भातील माहिती इस्रोने अधिकृत एक्सवरही (ट्विटर) दिली आहे.

Story img Loader