प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कार्यामधून चर्चेत असतात. शिवाय, ते सोशल मीडियावर देखील बरेच सक्रीय असतात हे देखील आपल्याला माहीत आहे. अशाच प्रकारे आनंद महिंद्रा यांनी यंदाचा मातृदिन खास पद्धतीने साजरा केला आहे, त्यांनी जे काही केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे, शिवाय सोशल मीडियावर जोरदार चर्चा देखील सुरू आहे. तामिळनाडूमध्ये लोकांना अवघ्या १ रुपयात इडली खाऊ घालणाऱ्या इडली अम्माला आनंद महिंद्रा यांनी आज हक्काचं नवीन घर दिलं आहे. त्यांनी तसं वचन दिलं होत आणि ते आज मातृदिनी पूर्ण देखील केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इडली आम्माला त्यांचे हक्काचे घर दिल्याची माहिती आनंद महिंद्र यांनी ट्वीटद्वारे दिली आहे. “आमच्या टीमचे अभिनंदन केले पाहिजे, ज्यांनी वेळेवर घराचे बांधकाम पूर्ण केले आणि मदर्स डेच्या दिवशी इडली अम्मा यांना ही भेट दिली. त्या एका आईच्या पालनपोषण, काळजी आणि निःस्वार्थीपणा या गुणांचे मूर्त स्वरूप आहेत. त्यांना आणि त्यांच्या कार्याला पाठिंबा देण्याचे भाग्य लाभले. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.” असं ट्वीटमध्ये म्हणत आनंद महिंद्रा यांनी यासोबतच त्याने एक व्हिडिओही ट्विट केला आहे.

तामिळनाडूतील कोईंबतूर जिल्ह्यात राहणाऱ्या एम.कमलाथल या इडली अम्मा नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या ८५ वर्षांपेक्षा जास्त आयुष्यात अनेक हिवाळे-पावसाळे अनुभवले आहेत. मागील तीन वर्षांपासून त्यांच्या भागात आलेल्या स्थालंतरित कामगार व अन्य लोकांसाठी त्या केवळ एक रुपयात इडली विकतात.

१० सप्टेंबर २०१९ मध्ये आनंद महिंद्रा यांनी इडली अम्मांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यावेळी त्यांनी, इडली अम्माच्या उद्योगात गुंतवणूक करणे आणि त्यांना चुलीऐवजी गॅस स्टोव्ह देणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जेव्हा महिंद्रा यांची टीम इडली अम्माला भेटायला पोहोचली तेव्हा त्यांनी एका नवीन घराची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या इच्छेचा आदर करत आनंद महिंद्रा यांनी त्यांच्यासाठी नवीन घर बनवून देण्याचा शब्द दिला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra gives a new home to idli amma msr