महिंद्रा अॅंण्ड महिंद्रा ग्रुपचे चेअरमॅन आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर जुगाड गाड्यांचा किंवा एखादा हटके व्हिडीओ शेयर करत असतात. ते आपल्या फॉलोअर्सला नेहमीच प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतात. आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा चारचाकीचा हटके व्हिडीओ शेयर केला आहे.

आनंद महिंद्रा यांनी ट्वीटरवर शेयर केलेल्या व्हिडीओत एका डायनिंग टेबलला चाकं लावली आहेत. सोबतच त्याला खुर्च्याही जोडण्यात आल्या आहेत. तसेच त्याला हॅंडलही आहे. हा गाडीसारखा दिवसणारा डायनिंग टेबल इंधन भरण्यासाठी गॅस स्टेशनवर जातानाही दिसतो आहे. हा गाडीसारखा दिवसणारा डायनिंग टेबल सद्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायल होतो आहे.

आनंद महिंद्रा नेहमीच असे हटके व्हिडीओ सोशल मीडियावर शेयर करत असतात. काही दिवसांपूर्वीच सांगलीतील दत्तात्रय लोहार यांच्या एका भन्नाट चार चाकीचा व्हिडीओ शेयर केला होता. हा व्हिडीओदेखील अनेकांना प्रचंड आवडा होता. त्यानंतर आनंद महिंद्रा यांनी दत्तात्रय लोहार यांना बोलेरे गाडीही भेट दिली होती.

Story img Loader