भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांनी रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. लतादीदींच्या पार्थिवावर शिवाजी पार्क मैदानात शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह सांस्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रांतील मान्यवर आणि संगीतप्रेमींची गर्दी लोटली होती.

Lata Mangeshkar : नक्षत्रांचे देणे.. परतले

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
sai godbole brand ambassador of the apple company
मराठी अभिनेत्रीची लेक झाली ‘Apple’ कंपनीची ब्रँड अँबॅसेडर! आईसाठी अभिमानास्पद क्षण; म्हणाली, “लॉस एंजेलिस येथे…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून

Lata Mangeshkar : भारताचा, भेदांपलीकडला सूर..

सोशल मीडियावरही अनेकांनी लतदींदींना श्रद्धांजली वाहत अखेरचा निरोप दिला. ट्विटरवर नेहमी सक्रीय असणारे महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनादेखील ट्वीट करुन लतादीदींना अखेरचा निरोप दिला. यावेळी त्यांनी करोना तू जाता जाता फार वाईट काम केलंस म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“करोना तू जाता जाता खूप वाईट काम केलंस. आमचा आवाज चोरलास. मी तुझा तिरस्कार करतो,” असं ट्वीट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.

लता मंगेशकर यांचं निधन –

करोनाचा संसर्ग झाल्याने लता मंगेशकर यांना ८ जानेवारी रोजी ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना सौम्य लक्षणे होती. परंतु हळूहळू त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. गेल्या आठवडय़ात त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीशी सुधारणा झाली होती. मात्र या आठवडय़ात पुन्हा त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाली आणि अवयव निकामी झाल्यामुळे रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांचे निधन झाल्याचे त्यांच्यावर उपचार करणारे ब्रीच कॅन्डी रुग्णालयातील डॉ. प्रतित समदानी यांनी सांगितले.

करोना संसर्गातून त्या बऱ्या झाल्या होत्या. परंतु करोनापश्चात त्यांच्या आजारात अधिक गुंतागुंत निर्माण झाल्याने त्यांचे निधन झाले, असे ब्रीच कॅन्डी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन संथनम यांनी सांगितले.

ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून दुपारी त्यांचे पार्थिक पेडर रोड येथील प्रभुकुंज निवासस्थानी आणण्यात आले. चित्रपटसृष्टीतील तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी प्रभुकंज येथे लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेतले. पेडर रोड येथून दुपारी ४ च्या सुमारास लता मंगेशकर यांची अंत्ययात्रा शिवाजी पार्कच्या दिशेने निघाली. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचली. त्यांच्या पार्थिवाचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी शिवाजी पार्क परिसरात चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. अतिमहत्त्वाच्या व्यक्तीही मोठय़ा संख्येने उपस्थित होते. अंत्ययात्रा शिवाजी पार्क मैदानात पोहोचल्यानंतर लता मंगेशकर यांचे पार्थिक अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.

विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी शिवाजी पार्क मैदानात लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन घेऊन आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मंगेशकर कुटुंबियांचे सांत्वन केले. लष्कर, नौदल आणि हवाई दलातर्फे लता मंगेशकर यांना शिवाजी पार्क मैदानात मानवंदना देण्यात आली. त्यानंतर हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

‘मेरी आवाज ही पहचान हैं’, ‘अखेरचा हा तुला दंडवत’, ‘ए मेरे वतन के लोगो’ अशी गाणी गात रसिकांनी शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. ‘लता दीदी अमर रहे’ अशा घोषणांनी शिवाजी पार्क दुमदुमून गेले.