महिंद्रा उद्योगसमूहाचे संचालक आनंद महिंद्रा सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह असतात. त्यांचे अनेक ट्वीट सोशळ मीडियावर व्हायरल झाल्याचं पाहायलं मिळतं. नुकतंच आनंद महिंद्रांनी करोनाबाबत केलेलं एक ट्वीट जोरदार व्हायरल झालं होतं, ज्यात त्यांनी “सगळ्या देशांनी आपापला एक करोना तयार करा आणि वर्षाच्या शेवटी त्यांच्यात स्पर्धा घेऊयात”, असं म्हणणाऱ्या एका व्यक्तीचं ट्वीट रीट्वीट केलं होतं. त्यानंतर आता आनंद महिंद्रांचं अजून एक ट्वीट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलं आहे. या ट्वीटमध्ये एका व्यक्तीने त्यांना पंजाबी असण्याबद्दल प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला त्यांनी दिलेलं उत्तर समस्त भारतीयांची मान अभिमानानं उंचावणारं ठरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

त्यानं ट्वीटच केलं डिलीट!

उद्योगपती आनंद महिंद्रा यांना एका व्यक्तीने ट्विटरवर एक प्रश्न विचारला होता. “मला माहिती आहे की हा असा प्रश्न विचारणं मूर्खपणाचं ठरेल. पण त्यासाठी मी मूर्ख होऊ इच्छितो. मला विचारायचंय की तुम्ही पंजाबी आहात का सर?” असा प्रश्न या व्यक्तीने विचारला. कौशिक असं या व्यक्तीचं नाव असल्याचं त्याच्या ट्विटर हँडलवरून दिसत आहे. या ट्वीटवर आनंद महिंद्रांनी त्याला असं काही उत्तर दिलं, की काही वेळातच त्यानं आपलं ट्वीटच डिलीट करून टाकलं!

काय म्हणाले आनंद महिंद्रा?

सकाळी या व्यक्तीनं प्रश्न विचारणारं ट्वीट केल्यानंतर आज दुपारी दीडच्या सुमारास आनंद महिंद्रांनी त्याच्या ट्वीटला रिप्लाय करत आपलं उत्तर दिलं होतं. “हा मूर्खपणा ठरेल असा काही प्रश्न नाही. पण या प्रश्नाला माझं थेट उत्तर आहे की मी एक भारतीय आहे…”! आनंद महिंद्रांनी हे उत्तर देताच काही वेळातच संबंधित व्यक्तीने आपलं ट्वीट डिलीट केलं आहे.

शुक्रवारी आनंद महिंद्रांनी करोनाबाबतचं एक ट्वीट रीट्वीट केलं होतं. “प्रत्येक देशाने आपआपला एक एक व्हेरिएंट काढावा. वर्षाच्या शेवटी आपण करोनाव्हायरल विश्वचषक स्पर्धा भरवूयात,” अशी उपहासात्मक प्रतिक्रिया देणारं एक ट्वीट रीट्वीट करताना आनंद महिंद्रांनी “मझा या विचाराला पाठिंबा आहे,” असं ट्वीट केलं होतं.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बर्फवृष्टीमध्ये थार घेऊन गुलमर्गला गेल्याचा फोटो शेअर केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना आनंद महिंद्रा यांनी “यापूर्वी कधीच याहून अधिक खरी गोष्ट बोललीच गेली नाहीय,” अशा अर्थाचा रिप्लाय दिला.

प्रत्येक देशाने आपआपला एक करोना व्हेरिएंट काढा आणि वर्षाच्या शेवटी आपण…; आनंद महिंद्रांचं ट्विट चर्चेत

आनंद महिंद्रा यांचे ट्वीट व्हायरल होत असतात. ट्विटरवर त्यांचा असा वेगळा चाहता वर्ग असून त्यांच्या ट्वीटवर हा वर्ग प्रतिक्रिया देत असतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anand mahindra tweet viral reply person asking are you a punjabi say i am an indian pmw