भारतीय जनता पक्षाने गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेशी काडीमोड घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर शिवसेनेही केंद्र सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी सुरू केल्याचे समजते.
मोदींच्या मंत्रीमंडळात अवजड उद्योग मंत्री असलेले शिवसेना नेते अनंत गीते दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाल्याचे समजते.
भाजपने पत्रकार परिषद घेऊन युती तोडण्याचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देणार नसून, पुढील काळातही मंत्रालयाचे काम पाहात राहू, असे गीते यांनी सांगितले होते. राज्यातील निर्णयांचा केंद्रातील आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही गीते यांनी स्पष्ट केले होते. आगामी काळात केंद्रातून बाहेर पडल्यास राज्यासंदर्भातील केंद्राशी सहमती नसलेल्या निर्णयांवर शिवसेना कोणती भूमिका घेते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Story img Loader