Andhra Pradesh Parents Suicide: आंध्रप्रदेशच्या एका मध्यमवयीन दाम्पत्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. नंद्याल शहरात राहणाऱ्या या दाम्पत्याच्या २४ वर्षीय मुलानं तृतीयपंथी व्यक्तीशी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना धक्का बसला होता. यानंतर त्यांनी स्वतःचे जीवन संपविले. नंद्यालचे उपविभागीय पोलीस अधिकारी पी. श्रीनिवास यांनी सांगितलं की, ४५ वर्षीय सुब्बा रायडू आणि त्यांची पत्नी सरस्वती यांनी आत्महत्या केली. अनेक महिन्यांपासून दाम्पत्याचा त्यांच्या मुलाशी वाद सुरू होता. त्यांचा मुलगा सुनील कुमार तीन वर्षांपासून स्थानिक तृतीयपंथी समुदायाशी जोडला गेला होता.

सुनील कुमारनं एखाद्या मुलीशी लग्न करावं, अशी त्याच्या पालकांची इच्छा होती. मात्र सुनीलनं यासाठी नकार दिला. तो गेल्या काही काळापासून तृतीयपंथी जोडीदाराबरोबर राहत होता. यावरून सुनीलचं आई-वडिलांबरोबर नेहमी भांडत होत असे.

हे वाचा >> १३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या

पोलिसांनी दिलेल्या बातमीनुसार, सुनीलनं पालकांशी होणाऱ्या वादाला कंटाळून काही काळापूर्वी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तपासात असेही निष्पन्न झाले की, सुनील कुमारनं तृतीयपंथी समाजातील एका व्यक्तीचे दीड लाख रुपये खर्च केले होते. हे पैसे परत मिळावेत म्हणून काही तृतीयपंथीयांनी सुनीलच्या पालकांचा जाहीर अपमान केला होता. तसेच पैशांची वसुली करण्यासाठीही दबाव टाकला. हा आर्थिक ताण आणि समाजात अपमान झाल्यामुळे सुनीलचे पालक तणावात होते. यातूनच त्यांनी जीवन संपविण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.

हे ही वाचा >> तृतीयपंथीयांचे संदर्भ सांगणाऱ्या पौराणिक कथा!

सुनील हा त्याच्या पालकांचा एकुलता एक मुलगा होता. बी.टेकचं शिक्षण घेतल्यानंतरही त्यानं रिक्षाचालकाचं काम सुरू केलं होतं, अशीही माहिती समोर आली आहे. पालकांच्या आत्महत्येनंतर पोलिसांनी औपचारिक चौकशी सुरू केली आहे.

Story img Loader