केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. आयोगाने लोकसभा निवडणुकबरोबर चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली आहे. ओडिशा, आंध्र प्रदेश, सिक्किम आणि अरुणाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत.

ओडिशात ४ टप्प्यात होणार निवडणूक</strong>

ओडिशात ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान चार टप्प्यात लोकसभेसह विधानसभेची निवडणूक होईल. ११, १८, २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान होईल. ओडिशामध्ये विधानसभेच्या १४७ जागा आहेत. येथे मुख्य लढत ही सत्तारुढ बिजू जनता दल, भाजपा आणि काँग्रेस यांच्यात होईल.

आंध्र प्रदेशात १७५ जागांवर ११ एप्रिलला मतदान

आंध्र प्रदेशमध्ये १७५ विधानसभा जागांवर पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी मतदान होईल. आंध्रमध्ये सत्ताधारी तेलुगू देशम पार्टी आणि वायएसआर काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

सिक्किमच्या ३२ जागांवर एकाचवेळी मतदान

सिक्किममध्ये ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभेसाठी मतदान होईल. सिक्किममध्ये ३२ जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होईल. येथे लोकसभेचा एकच मतदारसंघ आहे. सध्या मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या नेतृत्वाखाली सिक्किम डेमोक्रॅटिक फ्रंट पुन्हा एकदा सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहे. चामलिंग हे सिक्किममध्ये पाच वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. सहाव्यांदा ते आपले नशीब आजमावत आहेत.

अरुणाचलमध्येही ११ एप्रिलला मतदान

अरुणाचल प्रदेशच्या ६० जागांसाठी ११ एप्रिल रोजी मतदान होईल.

Story img Loader