चोरी करणारा मनुष्य कधी काय लंपास करेल याचा नेम नसतो. यापूर्वी पोलिसांनी अनेक धाडसी चोऱ्यांचा छडा लावलेला आहे. काही चोरांच्या करामती उजेडात आल्यानंतर पोलीसही चक्रावल्याची उदाहरणं आहेत. दरम्यान, आंध्रप्रदेशमध्ये अशाच काही चोरांचा कारनामा समोर आला आहे. येथे वीस जणांनी वेगवेगळ्या टिकाणांहून तब्बल ३०० मोबाईल्सची चोरी केली होती. या मोबाईल्सचे बाजारमूल्य ३० लाख रुपये असून पोलिसांनी २० जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
हेही वाचा >>> कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या ‘या’ औषधाला अत्यावश्यक औषधांच्या यादीतून वगळले; आरोग्य मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार आंध्र प्रदेशमधील चित्तूर पोलिसांनी २० चोरांना बेड्या ठोकल्या. तसेच त्यांच्याकडील ३०० मोबाईल जप्त केले. चोरांना अटक करण्यास मदत करणाऱ्यांना पोलिसांच्या तांत्रिक विभागाला चित्तूर पोलिसांनी बक्षिसही दिले. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईल फोनचे बाजारमूल्य साधारण ३० लाख रुपये आहे. अटक करण्यात आलेल्या २० चोरांनी हे फोन वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरले होते.