Andhra Pradesh college student Jumps Off 3rd Floor Viral Video : आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथील नारायण कॉलजमध्ये एक भीषण प्रकार समोर आला आहे. इंटर कॉलेजच्या पहिल्या वर्गात शिकणाऱ्या चरण नावाच्या विद्यार्थ्याने इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली आहे.या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ग चालू असताना एक विद्यार्थी वर्गातून बाहेर जाताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. तो चालत बाहेर जातो आणि गॅलरीमधून खाली उडी घेतो. सीसीटीव्ही फुटेजनुसार गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

या व्हिडीओमध्ये वर्ग पूर्णपणे भरलेला दिसत आहे. तसेच विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकही वर्गात आहेत. पण या घटनेनंतर सर्वांना धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान विद्यार्थ्याने उडी मारल्यानंतर सर्वजण त्याच्याकडे धावले.

पोलिसांनी काय सांगितलं?

अनंतपूर ग्रामीण उप विभागाचे पोलीस अधिकारी टी वेंकटशुलू यांनी सांगितलं की तो तरूण संक्रातीच्या सुट्ट्यांनंतर नुकताच कॉलेजला आला होता आणि त्याने गुरूवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी आत्महत्या केली.

“सुट्ट्यांनंतर हा मुलगा गुरूवारी सकाळी साडे नऊ वाजता कॉलेजमध्ये आला होता. वर्ग सरू असताना ११ वाजून ५५ मिनिटांच्या सुमारास तो वर्गातून बाहेर गेला आणि त्याने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली”, असे वेंकटशुलू यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.

तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर कॉलेज प्रशासनाने तरुणाला स्थानिक रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्याचा मृत्यू आधीच झाल्याचे जाहीर केले.

या विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच पोलिसांकडून आत्महत्येमागच्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh college student walks out of class dies after jumping from third floor video goes viral rak