Crime News : आंध्र प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या हत्येचा छडा लावण्याकरता पोलिसांना त्यांच्या श्वान पथकातील श्वानाने मदत केली. या श्वानाच्या मदतीने पोलिसांनी अल्पवयीन आरोपींचाही शोध घेतला. फ्री प्रेस जर्नलने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
आंध्र प्रदेशातील नांद्याल जिल्ह्यातील पागिडयाला मंडलातील मुचुमरी गावात रविवारी इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या ८ वर्षीय मुलीवर तिच्याच शाळेतील वरच्या वर्गात शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बलात्कार केला. ही मुलगी या मुलांबरोबर रविवारी स्थानिक उद्यानात खेळण्यासाठी गेली होती. बराचवेळ ती घरी न आल्याने तिच्या पालकांनी शोधाशोध सुरू केली. परंतु, ती कुठेच सापडली नाही. अखेर पालकांनी पोलीस ठाणे गाठले.
आरोपींचा माग काढण्यासाठी श्वान पथकाची मदत
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तत्काळ मुलीचा शोध सुरू केला. याप्रकरणी मुलीचा शोध घेण्याकरता पोलिसांनी श्वान पथकाचीही मदत घेतली. श्वानाने थेट गुन्ह्याच्या ठिकाणीच पोलिसांना नेलं. एवढंच नव्हे तर श्वानाने आरोपीचाही माग काढला.
हेही वाचा >> प्रेमसंबंधाला विरोध केला म्हणून १५ वर्षांच्या मुलाने आई-वडीलांसह भावाचा केला खून
आरोपींनी काय सांगितलं?
प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी आरोपी मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी त्यांच्या गुन्ह्याची कबुली दिली आणि गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी ८ वर्षीय मुलीची हत्या कशी केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली याची सविस्तर माहिती पोलिसांना दिली.
हेही वाचा >> सेवानिवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा सावत्र मुलगा व जावयावर बलात्काराचा आरोप; म्हणाली, “मला बांधून…”
TOI च्या वृत्तानुसार, मुलांनी पोलिसांना सांगितले की त्यांनी मुलीला त्यांच्यासोबत खेळण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्यांनी तिचे तोंड झाकले आणि मुचुमरी पाटबंधारे प्रकल्पाजवळील निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. नंतर ही घटना आई-वडिलांना सांगेल या भीतीने अल्पवयीन मुलांनी मुलीची हत्या करून तिचा मृतदेह सिंचन कालव्यात टाकून दिला.
నంద్యాల జిల్లాలో ఘోరం జరిగింది. ముచ్చుమర్రి పోలీస్స్టేషన్ పరిధిలోని ఎల్లాల గ్రమంలో మైనరు బాలిక గ్యాంగ్ రేప్!#nandyala#TDPJSPGovt pic.twitter.com/OkCh1i903u
— ??? ??? ???????? (@2029YSJ) July 10, 2024
कालव्यातील पाण्याची पातळी खोल असल्याने पोलिसांनी अद्याप पीडितेचा मृतदेह बाहेर काढलेला नाही, तसेच पावसामुळे तो काही अंतरावर वाहून गेला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार, मृतदेह बाहेर काढण्यासाठी शोध मोहिमेत प्रयत्न सुरू आहेत. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.