वृत्तसंस्था, नवी दिल्ली

अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने उद्याोगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर आंध्र प्रदेश सरकार अदानी समूहाबरोबर विद्याुत खरेदी करार स्थगित करण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारमधील दोन सूत्रांनी दिली आहे. यामुळे अदानी समूह अधिकच अडचणीत आल्याचे चित्र आहे.

Redevelopment , Developers Committee, Old Thane ,
जुन्या ठाण्यातील पुनर्विकासासाठी विकासकांची समिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
उत्तर प्रदेशला ३१ हजार कोटी तर बिहारला १७ हजार कोटींचे वाटप करण्यात आल्याबद्दल कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी टीका केली आहे.
केंद्राकडून महाराष्ट्राला १०,९३० कोटी; उत्तर प्रदेश, बिहारला अधिक निधी दिल्यावरून टीका
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Hasan Mushrif assures that Rs 2100 will be given to the sisters who are fond of scissors for development works
विकासकामांना कात्री पण लाडक्या बहिणींना २१०० रुपये; हसन मुश्रीफ यांची ग्वाही
Sanjay Raut on Mahavikas aghadi
Sanjay Raut : महाविकास आघाडीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, “काँग्रेसच्या केंद्रीय समितीने…”

अदानी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी काही राज्यांमध्ये विद्याुत प्रकल्प उभारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेने ठेवला आहे. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकार या आरोपांचा तपास करण्याची मागणी (पान ४ वर) (पान १ वरून) केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सौरऊर्जा महामंडळाला (एसईसीआय) करणार आहे असे सूत्रांनी सांगितले. वीजपुरवठा करण्यासाठी अदानीसारख्या कंपन्यांना कंत्राट देण्याचे काम ‘एसईसीआय’कडून केले जाते. याअंतर्गत आंध्र प्रदेशला वीजपुरवठा पुढील वर्षात सुरू होणार आहे. मात्र, हा करार स्थगित करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिकेच्या अभियोक्त्यांनी अदानींवर ठेवलेल्या आरोपांनंतर कारवाई करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य असेल.

हेही वाचा >>>‘मूल्यांची अंमलबजावणी महत्त्वाची’; संविधान दिन सोहळ्यामध्ये मुर्मू यांच्याकडून प्रथम राष्ट्रपतींच्या मार्गदर्शनाचे स्मरण

अदानींनी कथिरतिच्या दिलेल्या लाचेचा मोठा हिस्सा, म्हणजे २२८ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. राज्य विद्याुत वितरण संस्थेने अदानी समूहाकडून वीज खरेदी करण्याचा करार करण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचे अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद करण्यात आले आहे.

श्रीलंकेतील प्रकल्प अधांतरी?

गौतम अदानी आणि सागर अदानींसह अदानी समूहाच्या काही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेल्या आरोपांचे परिणाम काय होऊ शकतात याचा आढावा घेतला जात असल्याचे श्रीलंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीलंकेतील बंदर विकासाचे कंत्राट अदानी समूहाकडे असून या प्रकल्पासाठी अमेरिकी संस्थेने आणखी ५५ कोटी डॉलर कर्ज देण्याचे मान्य केले आहे. त्यांनीही लाचखोरीच्या आरोपांकडे लक्ष असल्याचे सांगितले.

Story img Loader