वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अमेरिकेच्या न्याय मंत्रालयाने उद्याोगपती गौतम अदानी यांच्यावर केलेल्या लाचखोरीच्या आरोपांनंतर आंध्र प्रदेश सरकार अदानी समूहाबरोबर विद्याुत खरेदी करार स्थगित करण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारमधील दोन सूत्रांनी दिली आहे. यामुळे अदानी समूह अधिकच अडचणीत आल्याचे चित्र आहे.
अदानी समूहाचे संस्थापक व अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी काही राज्यांमध्ये विद्याुत प्रकल्प उभारणीचे कंत्राट मिळवण्यासाठी २६५ दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेने ठेवला आहे. आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकार या आरोपांचा तपास करण्याची मागणी (पान ४ वर) (पान १ वरून) केंद्र सरकार आणि राष्ट्रीय सौरऊर्जा महामंडळाला (एसईसीआय) करणार आहे असे सूत्रांनी सांगितले. वीजपुरवठा करण्यासाठी अदानीसारख्या कंपन्यांना कंत्राट देण्याचे काम ‘एसईसीआय’कडून केले जाते. याअंतर्गत आंध्र प्रदेशला वीजपुरवठा पुढील वर्षात सुरू होणार आहे. मात्र, हा करार स्थगित करण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास अमेरिकेच्या अभियोक्त्यांनी अदानींवर ठेवलेल्या आरोपांनंतर कारवाई करणारे आंध्र प्रदेश हे भारतातील पहिले राज्य असेल.
अदानींनी कथिरतिच्या दिलेल्या लाचेचा मोठा हिस्सा, म्हणजे २२८ दशलक्ष डॉलर इतकी रक्कम आंध्र प्रदेश सरकारच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. राज्य विद्याुत वितरण संस्थेने अदानी समूहाकडून वीज खरेदी करण्याचा करार करण्यासाठी ही लाच देण्यात आल्याचे अमेरिकेच्या आरोपांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
श्रीलंकेतील प्रकल्प अधांतरी?
गौतम अदानी आणि सागर अदानींसह अदानी समूहाच्या काही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आलेल्या आरोपांचे परिणाम काय होऊ शकतात याचा आढावा घेतला जात असल्याचे श्रीलंकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. श्रीलंकेतील बंदर विकासाचे कंत्राट अदानी समूहाकडे असून या प्रकल्पासाठी अमेरिकी संस्थेने आणखी ५५ कोटी डॉलर कर्ज देण्याचे मान्य केले आहे. त्यांनीही लाचखोरीच्या आरोपांकडे लक्ष असल्याचे सांगितले.
© The Indian Express (P) Ltd