Pushpa Box Office Collection : तेलुगु अभिनेता अल्लू अर्जुन याचा पुष्पा २ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. हैदराबाद येथील संध्या चित्रपटगृहाबाहेर प्रीमियर दरम्यान झालेल्या चेंगराचंगरीनंतर हा चित्रपट वादात सापडाल आहे. या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन हा एका रक्तचंदन तस्कराची भूमिका करताना दाखवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी (पुष्पा भाग एक आणि दोन) एकत्रित सुमारे १,५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

एकीकडे पुष्पा हा चित्रपट दररोज कमाईचे नवे विक्रम नोंदवत आहे, तर दुसरीकडे प्रत्यक्षात मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात ग्राहकांच्या कमतरतेमुळे, आंध्र प्रदेश सरकारला रक्त चंदनाच्या लिलावातून नफा कमावण्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Farmers administration and government conflicted over soybean guaranteed purchase price 57 percent purchased
शेतकरी, सरकारची ‘ सोयाबीन कोंडी’ जाणून घ्या, नेमकी स्थिती, तूर खरेदीचे काय होणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
maharashtra tops in soybean procurement
सोयाबीन खरेदीत महाराष्ट्र अव्वल;जाणून घ्या, राज्यातून खरेदी किती झाली
Many people including businessman were cheated of Rs 2 crore by promising double profits
दुप्पट नफ्याचे आमिष दाखवत व्यापाऱ्यासह अनेकांना दोन कोटीचा गंडा
state government fixed Dharavi redevelopment plots with Kurla Dairy priced ten times lower
धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा दहा पट कमी दराने कुर्ला डेअरीचा भूखंड
Now money even for contaminated blood revised rules for blood banks
आता दूषित रक्तासाठीही पैसे, रक्तपेढ्यांसाठी सुधारित नियम
Chandrashekhar Bawankule statement regarding the purchase of agricultural materials during Dhananjay Munde era
धनंजय मुंडेंच्या काळातील कृषी साहित्य खरेदी: बावनकुळे काय म्हणाले?
8.12 lakh tonnes of soybeans were procured at guaranteed prices 37 lakh sold privately
३८ लाख टन सोयाबीन कवडीमोल दरात

रक्तचंदन ही लुप्तप्राय प्रजाती (Endangered Species) म्हणजेच नष्ट होण्याच्या जवळपास पोहचलेली वनस्पती आहे. त्यामुळे रक्तचंदनाची झाडे तोडणे आणि त्याची विक्री करणे बेकायदेशीर आहे. मात्र भारताला लुप्तप्राय प्रजातींच्या यादीमधून बाहेर काढून, सरकारच्या विशेष परवानगीने एका मर्यादेत कायदेशीर पद्धतीने रक्तचंदच्या विक्रीची परवानगी आहे.

रक्तचंदन हे प्रामुख्याने आंध्र प्रदेशच्या रायलसीमा (Rayalaseema) या भागात आढळणारी वनस्पती आहे. दरम्यान अनेक प्रयत्न करूनही आंध्र प्रदेश सरकार कोरोना काळापासून आंतरराष्ट्रीय बाजारात एक टनभरही रक्तचंदनाची विक्री करू शकलेले नाही. आंध्र प्रदेश सरकार हे भारतातील रक्तचंदनाचे प्रमुख अधिकृत विक्रेता आहेत.

आंध्र प्रदेश सरकारमधील सूत्रांनी सांगितले की, २०२० साली कोरोना महामारी सुरू झाल्यापासून कोणत्याही आंतरराष्ट्रीय लिलावात रक्तचंदन विकले गेले नाही. या लाकडाची मुख्य बाजारपेठ असलेल्या चीनमध्ये देखील मागणी खूपच कमी झाली आहे. १९९० च्या दशकापासून आंध्र प्रदेश सरकारने आंतरराष्ट्रीय लिलावाच्या जवळपास २४ फेऱ्या आयोजित केल्या आहेत परंतु यामधून त्यांना फक्त १,८०० ते १,९०० कोटी रुपये जमवता आले आहेत. ही रक्कम पुष्पा चित्रपटांच्या कमाईपेक्षा किंचितच जास्त आहे.

दरम्यान या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ९०५ टन रक्त चंदनाचा लिलाव करण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु आंध्र प्रदेश सरकारला एक टनही लाकूड विकण्यात यश आलं नाही. “चीन ही मुख्य बाजारपेठ राहिली आहे, पण कोरोनाच्या साथीनंतर २०२० पासून मागणी घसरली आहे,” असा दावा सूत्रांनी केला आहे.

हेही वाचा>> पुणे जिल्हा हादरला! दोन अल्पवयीन बहि‍णींवर बलात्कार करून खून; ५४ वर्षीय आरोपीला अटक…

सध्या किंमत किती आहे?

डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने आंध्र प्रदेश सरकारला ११,००० टन रक्त चंदनाचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे, पण त्यापैकी सुमारे ४,००० टन रक्तचंदनाचे लाकूड अजूनही तिरूपती येथील एका सुरक्षित ठिकाणी पडून आहे.

तेलगू देसम पक्षाच्या सरकारच्या मागील कार्यकाळात झालेल्या लिलावात पहिल्यांदा रक्तचंदनाला १ कोटी ते दीड कोटी रुपये प्रति टन दर मिळाला होता. दरम्यान सरकारकडून रक्तचंदनाची तीन श्रेणींमध्ये वर्गवारी केली जाते. यापैकी ए-ग्रेड रक्तचंदनाची किंमत सध्या सुमारे ७५ लाख रुपये प्रति टन आहे. सध्या बाजारात मागणी कमी झाली असली तरीही याची किंमत कमी करण्याचा कोणताही विचार नसल्याचे सरकारच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

Story img Loader