Loan App Harassment: कर्ज देणाऱ्या मोबाइल ॲपवरून कर्ज घेऊ नका, असे आवाहन वांरवार करण्यात येत असते. कर्ज देणाऱ्या ॲपकडून छळवणुकीचे अनेक प्रकार आजवर समोर आलेले आहेत. तरीही काहीजण ॲपवरून कर्ज घेतात आणि त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. आंध्र प्रदेशमध्ये नुकतेच लग्न झालेल्या एका जोडप्याबरोबर अशीच धक्कादायक घटना घडली. २८ ऑक्टोबर रोजी लग्न झालेल्या एका तरुणाने ॲपच्या छळवणुकीला कंटाळून आत्महत्या केली. केवळ दोन हजारांचे कर्ज ॲपवरून घेतल्यानंतर ते वेळेत परत न दिल्यामुळे ॲपने तरुणाच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून त्याचे मित्र आणि कुटुंबियांमध्ये व्हायरल केले. ज्यामुळे नवविवाहित तरुणाने आत्महत्या केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरेंद्र (वय २५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून त्याचे अखिला नावाच्या मुलीशी २८ ऑक्टोबर रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर जोडपे विशाखापट्टणम येथे राहत होते. तरुण मासेमारीचे काम करत होता. मात्र मागच्या काही दिवसांपासून वातावरण खराब असल्यामुळे त्याला मासेमारी करता आली नाही. ज्यामुळे आर्थिक ताण निर्माण झाला. खर्च भागविण्यासाठी नरेंद्रने मोबाइल ॲपवरून दोन हजार रुपयांचे कर्ज घेतले. मात्र काही आठवड्यातच कर्ज परत देण्यासाठी मोबाइल ॲपवरील एजंटनी त्याचा छळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याला आक्षेपार्ह संदेश पाठविले.

हे वाचा >> ‘नवरा आणि सासरच्या लोकांचा छळ करण्यासाठी कायद्याचा दुरूपयोग नको’, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

ॲपवरील एजंटने नरेंद्रच्या पत्नीचे फोटो मॉर्फ करून त्यावर किंमत लिहिले आणि तिचे फोटो नरेंद्रचा मित्रपरिवार आणि कुटुंबियांना पाठविले. यासाठी नरेंद्रच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा वापर केला गेला. पत्नीच्या मोबाइलवरही सदर फोटो आल्यानंतर तिने नरेंद्रकडे याची विचारणा केली, तेव्हा तिला कर्जाबाबत त्याने माहिती दिली. यानंतर जोडप्याने ॲपवरील एजंट संपूर्ण कर्ज परत देण्याचा निर्णय घेतला. तरीही त्यांची छळवणूक थांबाली नाही.

पत्नीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर नरेंद्रला नातेवाईक फोन करून हा काय प्रकार आहे, याची विचारणा करू लागले. या सर्व प्रकारामुळे खचलेल्या नरेंद्रने मंगळवारी (१० डिसेंबर) आत्महत्या केली. लग्नानंतर अवघ्या काही महिन्यात नरेंद्रने आत्महत्या केल्यामुळे आता हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मागच्या आठवड्यापासून आंध्र प्रदेशमध्ये ही तिसरी घटना घडली आहे. नांदयाल जिल्ह्यात एका तरुणीची कर्ज देणाऱ्या ॲपकडून छळवणूक करण्यात आली.

कर्ज देणाऱ्या ॲपवरून अतिशय सोप्या पद्धतीने कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. सर्व प्रक्रिया ऑनलाइन होत असल्यामुळे फार कागदपत्रांचीही आवश्यकता भासत नाही. मात्र कर्जाची परतफेड करताना ॲपवरील एजंट ज्या पद्धतीने वसूली करतात त्यावर अनेकदा टीका झाली. आंध्र प्रदेशच्या गृहमंत्री अनिता यांनी मागच्या महिन्यात विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. कर्ज देणारे ॲपवरून जे लोक छळवणूक करत आहेत, त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असे त्या म्हणाल्या.