विजयवाडा : आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल येथे एका मुलीशी कथित प्रेमसंबंधांच्या कारणावरून एका आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याच्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, मोटा नवीन याला १९ जून रोजी मन्नम रामंजनेयुलु आणि इतर आठ जणांनी मारहाण केली आणि त्याच्यावर लघुशंका केल्याचा आरोप आहे. यातील दोन आरोपी अल्पवयीन आहेत, तर रामंजनेयुलु हा फरार आहे. रमांजनेयुलू आणि नवीन हे मित्र होते. परंतु नवीनचे रामंजनेयुलुच्या मित्राच्या ओळखीच्या मुलीशी संबंध असल्याने या दोघांत भांडण झाले. नवीन हा संबंधित तरुणीसह पळून गेला होता. त्यामुळे रामंजनेयुलु आणि त्याचे मित्र संतप्त झाले होते. त्यांनी नवीनवर हल्ला केला आणि त्याच्यावर लघुशंकाही केली.
आदिवासीवर लघुशंकाप्रकरणी आंध्रमध्ये सहा जणांना अटक
प्रेमसंबंधांच्या कारणावरून एका आदिवासी तरुणावर लघुशंका केल्याच्या आरोपावरून सहा जणांना अटक करण्यात आली.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 20-07-2023 at 02:21 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Andhra pradesh police arrest 6 persons for urinating on tribal man zws