Andhra Pradesh Explosion: आंध्र प्रदेशमधील अनकापल्ले जिल्ह्यामध्ये असलेल्या एका फार्मा कंपनीमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फार्मा कंपनीतील एका युनिटमध्ये मोठा स्फोटा झाल्याची घटना घडली. यामध्ये १५ जणांचा मृत्यू झाला असून ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले होते.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशातील अनकापल्ले जिल्ह्यातील एस्सियंटिया या फार्मास्युटिकल कंपनीत बुधवारी दुपारी भीषण स्फोट होऊन १५ जणांचा मृत्यू झाला. तर ४० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारच्या जेवणावेळी कंपनीतील काही कामगार जेवणासाठी बाहेर गेले होते. मात्र, यावेळी ही घटना घडली. जेवणासाठी अनेक कामगार बाहेर गेल्यामुळे अनेकांचा जीव बचावला आहे.

Nitrate-rich groundwater in Wardha district
धक्कादायक! वर्धा जिल्ह्यातील भूगर्भात नायट्रेटयुक्त पाणी, कर्करोगासह विविध आजार…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
In four cases of burglary in different parts of Nashik city more than 30 lakhs lost
बुलढाणा : पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून पेटवले! माजी सैनिक अत्यवस्थ!
terrorist cases are investigated with caste bias
प्रत्येक दहशतवादी प्रकरणाचा तपास जातीय पूर्वग्रहातून, दोषसिद्ध आरोपींचा उच्च न्यायालयातील अपिलात आरोप
part of house collapse in Jogeshwari, house Jogeshwari,
जोगेश्वरीत घराचा भाग कोसळून पाच जण जखमी
amravati food poison news in marathi
अमरावती : धक्कादायक! शंभरावर कामगारांना विषबाधा, गोल्डन फायबर कंपनीत…
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
explosion occurred in Shankeshwarnagar Nalasopara East
नालासोपाऱ्यात परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट, चार जण जखमी

हेही वाचा : Kolkata Crime : “डॉ. संदीप घोष बेवारस मृतदेह विकायचे, आणि..” आर. जी. कर रुग्णालयातील माजी अधिकाऱ्याचा धक्कादायक आरोप

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर घटनास्थळावर तात्काळ रुग्णवाहिका दाखल होत जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमी झालेल्या कामगारांवर उपचार सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. फार्मा कंपनीत भीषण स्फोटाची घटना घडल्यानंतर कंपनीच्या परिसरात राखाडी धुराचे मोठमोठे लोट पसरले होते.

या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाकडून मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, एस्सियंटिया या फार्मास्युटिकल कंपनीत आधी भीषण स्फोट झाला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. तसेच आपला जीव वाचवण्यासाठी कामगारांनी कंपनीच्या बाहेर धाव घेत आपला जीव वाचवला. सध्या कंपनीला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिसांकडून मदत कार्य सुरु असून कंपनीत अडकलेल्या कामगारांची सुटका करण्यात येत आहे.

Story img Loader