आंध्र प्रदेशातील विजयनगरम जिल्ह्यात रविवारी संध्याकाळी दोन रेल्वेगाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातात किमान १३ जणांचा मृत्यू झाला, तर ५० प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांपैकी ७ जणांची ओळख पटवण्यात आली असून इतरांची ओळख पटवण्याचं कार्य सुरू आहे, अशी माहिती विजयनगरमच्या एसपी दीपिका यांनी दिली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजरने विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजरला पाठीमागून धडक दिली. मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून अधिक तपास सुरू आहे. दरम्यान, अद्यापही बचावकार्य सुरूच आहे.

पूर्व किनारपट्टी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हावडा-चेन्नई मार्गावरील अलमांडा आणि कंटकपल्ली स्थानकांदरम्यान ही दुर्घटना घडली. या धडकेमुळे पलासा पॅसेंजरचे इंजिन तसेच रायगड पॅसेंजरचे शेवटचे दोन डबे रुळांवरून घसरले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक सौरभ प्रसाद दुर्घटनास्थळी पोहोचले असून आपत्कालिन पथकही दाखल झाले. घसरलेले डबे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, पश्चिम किनारा रेल्वेने हेल्पलाईन सुरू केली असून राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेलाही याची माहिती देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी राज्याच्या अधिकाऱ्यांना बचावकार्यात सर्वतोपरी मदत करण्याची सूचना केली आहे.

Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ल्यात बस आदळल्यानंतर चालक संजय मोरेंनी असा काढला बसमधून पळ; VIDEO व्हायरल!
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
mankhurd subways in pathetic condition waiting for repairs
मानखुर्दमधील भुयारी मार्ग डागडुजीच्या प्रतीक्षेत
Devendra Fadnavis Kurla BEST Bus Accident Updates in Marathi
Kurla Bus Accident : कुर्ला दुर्घटनेतील मृतांची संख्या सातवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नातेवाईकांना नुकसानभरपाईची घोषणा!
two daughters of a sugarcane cutter died
ट्रॅक्टर अपघातात ऊसतोड मजुराच्या दोन्ही मुलींचा मृत्यू
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी
pune two wheeler accident marathi news
पुणे : सातारा रस्त्यावर बीआरटी मार्गात दुचाकींची समोरासमोर धडक, दोघे जण जखमी

अनेक रेल्वे गाड्या रद्द

प्राथमिक माहितीनुसार, विशाखापट्टणम-रायगड ट्रेनने सिग्नल ओव्हरशूट केल्यामुळे हा अपघात झाला आहे. म्हणजेच मानवी चुकीमुळे हा अपघात घडला आहे. रेल्वे दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक गाड्या वळवण्यात आल्या आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच काही शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने X (पूर्वीचे ट्विटर) वर दिली. पूर्व किनारपट्टी रेल्वेचे सीपीआरओ बिस्वजित साहू यांनी सांगितले की, सोमवारी एकूण १८ गाड्या रद्द करण्यात आल्या असून २२ गाड्या वळवण्यात आल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, रेल्वे अधिकारी आज दुपारी ४ वाजेपर्यंत ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव यांच्यात संवाद झाला आहे.

मुख्यमंत्र्यांचे आदेश

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी यांनी तात्काळ मदत उपाययोजना करण्याचे आणि विशाखापट्टणम आणि विजयनगरमच्या जवळच्या जिल्ह्यांमधून अपघाताच्या ठिकाणी जास्तीत जास्त रुग्णवाहिका पाठवण्याचे आदेश जारी केले. जखमींना चांगली वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी जवळच्या रुग्णालयांमध्ये सर्व प्रकारची व्यवस्था करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अधिकार्‍यांना आरोग्य, पोलीस आणि महसूल यासह इतर सरकारी विभागांशी समन्वय साधून जखमी लोकांवर तातडीने वैद्यकीय सेवा देण्याच्या उद्देशाने त्वरित मदत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.

मृतांच्या नातेवाईकांना भरपाई जाहीर

रेड्डी यांनी रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ही आर्थिक मदत आंध्र प्रदेशातील लोकांसाठी आहे. दरम्यान, ज्यांचा मृत्यू झाला, परंतु ते इतर राज्यातील आहेत त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये देण्यात येणार आहेत. गंभीर जखमी झालेल्या आंध्र प्रदेशातील प्रवाशांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि इतर राज्यातील प्रवाशांना प्रत्येकी ५० हजार रुपये दिले जातील. तसंच, पंतप्रधान मोदींनी प्रत्येक मृताच्या कुटुंबासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे, तर जखमींना ५० हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे.

Story img Loader