सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती गंभीर बनली आहे. याची किंमत आपल्या जवानांना भोगावी लागत आहे. त्यातच राफेल घोटाळाही समोर आला आहे. या सर्व गोष्टी परस्परांशी जोडलेल्या आहेत. कारण, काहीही न करता सरकार अनिल अंबानींना ३० हजार कोटी रुपये देऊ शकते तर सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ का देऊ शकत नाही, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.


राहुल गांधी, माजी सैनिकांसोबत आमची आज खूपच माहितीपूर्ण बैठक झाली. यातून अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. ‘वन रँक वन पेन्शन’चाही मुद्दा याद्वारे समोर आला आहे. या बैठकीदरम्यान, पंतप्रधानांकडून अद्याप ‘वन रँक वन पेन्शन’ लागू करण्यात आलेली नाही, असे माजी सैनिकांनी स्पष्टपणे सांगितल्याचे राहुल गांधींनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Story img Loader