अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांना एक हजार कोटी रूपयांच्या अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. रिलायन्सकडून मुंबई उच्च न्यायालयात निरूपम यांच्याविरोधात ही याचिका दाखल केली जाणार आहे. मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीचे बाजारमूल्य ५७७५ कोटी रुपये असताना अदानी उद्योग समूहातील अदानी ट्रान्समिशन कंपनीने १८ हजार ८०० कोटी रुपयांना विकत घेतल्याचा आरोप निरूपम यांनी केला होता. या अधिग्रहणामागे पंतप्रधान कार्यालय असल्याचेही त्यांनी म्हटले होते. मात्र, कंपनीने निरूपम यांचे हे सर्व आरोप खोटे आणि आधारहीन असल्याचे म्हटले आहे. ७२ तासांच्या आत निरूपम माफी मागावी असेही म्हटले आहे. दरम्यान, निरूपम यांनी याबाबत आपण गप्प बसणार नसून लोकहितासाठी पुढेही आवाज उठवू, असे म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा