मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

अनिल देशमुख यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, देशमुख हे ७३ वर्षांचे आजारी वृद्ध आहेत. शिवाय त्यांना अनेक प्रकारचे आजारही आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा व त्यांचा संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.

२५ मार्च रोजी याचिका दाखल करण्यात आली होती –

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत म्हटले होते की, २५ मार्च रोजी त्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्याची सुनावणी होत नाहीए. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करत उच्च न्यायालयाला या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले आहे.

नुकतेच रुग्णालयात दाखल केले होते –

अनिल देशमुख यांना नुकतेच उच्च रक्तदाब आणि छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या न्यायालयीन कोठडीत तुरुंगात आहे. अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असून त्यांना या प्रकरणी सीबीआयने ६ एप्रिल रोजी अटक केली होती.