Tension in Rajasthan: राजस्थानच्या शाहपुरमध्ये बुधवारी जातीय तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसले. गणपती मंडपाबाहेर मृत प्राण्याचे अवशेष आढळून आल्यानंतर धार्मिक संघटनांनी शहरात आंदोलन सुरू केले. अखेर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणात लक्ष घालून सत्य समोर आणल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ७.३० च्या दरम्यान मंडपाबाहेर शेळीचे अवशेष मिळाल्याची अफवा पसरली. मंडपातील गणपतीच्या मूर्तीचे ज्या तलावात मंगळवारी विसर्जन करण्यात आले, त्या तलावाबाहेरच शेळीच्या मृत शरीराचे अवशेष आढळून आल्यामुळे वाद उफाळला होता. कुणीतरी मुद्दामहून हे अवशेष टाकल्याचा आरोप धार्मिक संघटनांनी केला.

शाहपुराचे पोलीस अधीक्षक राजेश कवंत यांनी मात्र प्राण्याचे अवशेष कुणीतरी जाणूनबुजून टाकल्याची शक्यता फेटाळून लावली. तसेच कुणीही शांतता भंग करण्याचा प्रयत्न करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, गणपती मंडपाजवळ प्राण्याचे अवशेष मिळाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर आम्ही तात्काळ घटनास्थळी पथक रवाना केले. तपास करत असताना सीसीटीव्ही तपासण्यात आले. तेव्हा भटक्या कुत्र्यांनी मृत पावलेल्या शेळीचे लचके तोडल्याचे दिसले. याच भटक्या कुत्र्यांनी शेळीचे अवशेष गणपती मंडपासमोर असलेल्या तलावाजवळ टाकले होते. ही माहिती आम्ही आंदोलन करणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आणि धरणे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.

Lebanon Walkie-Talkies Explode
Lebanon Explosion : लेबनॉन पुन्हा हादरलं, पेजरच्या स्फोटानंतर आता वॉकीटॉकी आणि रेडिओचा स्फोट; ९ जणांचा मृत्यू, ३०० जण जखमी
Check the List of Highest-Selling Cars of the Year
‘या’ सात सीटर कारला लोकांची सर्वात जास्त पसंती,…
Viral Video
Kanpur Viral Video : चोरट्याने देवाला आधी जल अर्पण केलं अन् मग चोरला कलश; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
Venus Orbiter Misson
Venus Orbiter Misson : आता शुक्रावर स्वारी! चांद्रयान आणि मंगळयान मोहिमेनंतर भारताचं नवं उड्डाण! व्हिनस मिशनला कॅबिनेटची मंजुरी
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

हे वाचा >> One Nation One Election: ‘एक देश, एक निवडणूक’ संकल्पनेला मंत्रिमंडळाची मंजुरी; हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार?

जिल्हाधिकारी राजेंद्र सिंह शेखावत यांनी सांगितले की, पोलिसांनी केलेल्या चौकशीत आतापर्यंत काहीही संशयास्पद आढळून आलेले नाही. शाहपुरा शहर हे धार्मिक सौहार्दाबद्दल ओळखले जाते. त्यामुळे लोकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

आज हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन पुकारल्यानंतर शहरातील बाजारपेठ, दुकाने बंद ठेवण्यात आली होती. तसेच निदर्शन करणाऱ्या आंदोलकांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली. काही आंदोलक गणपती मंडपाबाहेर जमले आणि त्यांनी आरोपींना पकडण्याची मागणी लावून धरली. नगर पंचायतीचे अध्यक्ष रघुनंदन सोनी यांनी दावा केला की, शहरातील शांतता भंग करण्यासाठी ही घटना नियोजन करून घडवून आणली आहे.