आपल्या अदाकारीने  अँजेलिना जोलीने जगभरामध्ये प्रसिद्धी मिळविली असली, तरी अफगाणिस्तानमध्ये तिची ओळख सिनेस्टार, हॉलीवूडची मदनिका म्हणून नाही, तर मदतकर्ती किंवा अभियंता म्हणून असल्याचे पुढे आले आहे. संयुक्त राष्ट्रांची विशेष दूत म्हणून अफगाणिस्तानमधील निर्वासितांच्या भागांमध्ये कार्यरत असलेल्या जोलीने क्वाला-इ-गदर भागामध्ये गेल्या वर्षी एक शाळा उभारली होती. सध्या तिने सादर केलेल्या दागिन्यांच्या मालिकेतून मिळणाऱ्या नफ्यातून ती आणखी काही शाळा उभारण्याच्या तयारीत आहे. या भागात तिची लोकप्रियता ही केवळ मदतकर्ती म्हणून आहे.  या भागातील नागरिकांनी कधीही चित्रपट पाहिलेला नसल्यामुळे अंजेलिना जोली हिची सिनेमातील जागतिक कीर्ती या भागासाठी शून्य आहे. या भागातील विद्यार्थ्यांना शाळा कुणी बांधली, हे विचारल्यानंतर, ‘एका सुंदर अमेरिकी बाईने’ अशी उत्तरे दिली जातात.

Story img Loader