Karnataka Idgah ground Ganeshotsav : कर्नाटकमधील हुबळी धारवाडच्या ईदगाह मैदानात यंदा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. आधी या मैदानावर गणेशोत्सव साजरा करण्याची परवानगी देण्याच्या आदेशाला कर्नाटक उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. मात्र, उच्च न्यायालयाने रात्री उशिरा १० ते १२ दरम्यान सुनावणी करत हुबळ-धारवाड महापौरांच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. तसेच ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला सशर्त परवानगी दिली. आता याविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंजुमन इस्लामने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. बुधवारी (३१ ऑगस्ट) हिंदू नेत्यांनी ईदगाह मैदानावर गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.

मंगळवारी (३० ऑगस्ट) दोन स्वतंत्र याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी नाकारली होती. दुसरीकडे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बुधवारी रात्री उशिरा १० ते १२ दरम्यान सुनावणी घेत काही अटीशर्तींसह ईदगाह मैदानावर गणेशोत्सवाला परवानगी दिली.

हेही वाचा : Ganesh Utsav 2022 Live : राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे आगमन; जाणून घ्या गणेशोत्सवाचे लाईव्ह अपडेटस्

आता पुन्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आलं आहे. यावर सर्वोच्च न्यायालय काय निकाल देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.