उत्तराखंडमध्ये एका १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह कालव्यात आढळला होता. अंकिता भंडारी, असे या तरुणीचे नाव असून, ती पौडी जिल्ह्यातील ‘वनतारा’ रिसॉर्टमध्ये काम करत होती. अंकिताच्या खूनाचा आरोप असलेल्या पुलकित आर्य याच्या मालकीचे हे ‘रिसॉर्ट’ आहे. पुलकित आर्य हा उत्तराखंड भाजपाचे माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात तरुणीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तरुणीच्या मृतदेहावर जखमा असल्याचेही समोर आले आहे. अंकिताच्या खून प्रकरणात पुलकित आर्या आणि त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणावरती माजी भाजपा नेते विनोद आर्य यांनी मुलावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझा मुलगा सरळ, साधा आहे. पुलकित आणि अंकिताला न्याय मिळायला हवा. तपासावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी मी आणि माझा मुलगा अंकितने भाजपाचा राजीनामा दिला आहे,” असं त्यांनी स्पष्ट केलं. याबाबत एनटीव्हीने वृत्त दिलं आहे.

‘रिसॉर्ट’मध्ये आलेल्या ग्राहकांना ‘विशेष सेवा’ पुरवावी, असा पुलकित आर्यचा अंकितावर दबाव असल्याचा आरोप आहे. शुक्रवारी रिसॉर्टचे व्यवस्थापक सौरभ भास्कर आणि सहायक व्यवस्थापक अंकित गुप्ता यांना अटक करण्यात आली. त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

तरुणीवर अंत्यसंस्कार करणार नाही

दरम्यान, पीडितेच्या शवविच्छेदनाचा अंतिम अहवाल येईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा कुटुंबियांनी घेतला आहे. पीडितेवर अंत्यसंस्कार करण्याबाबत प्रशासनाकडून नातेवाईकांची मनधरणी करण्यात येत आहे. पीडितेच्या नातेवाईकांनी आणि काही स्थानिकांनी श्रीनगर-केदारनाथ महामार्ग रोखून धरल्याचेही वृत्त आहे.

Story img Loader