ज्येष्ठ समाजसेवक आणि भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांना आज (शुक्रवारी) सकाळी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अण्णांना सकाळी अचानक  अस्वास्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. अण्णांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आल्याचे त्यांच्या सहकारी किरण बेदींनी टि्वटरवर म्हटले आहे. मात्र, अण्णांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप खपलासा करण्यात आलेला नाही. दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते आणि अण्णांचे जुन् सहकारी अरविंद केजरीवाल यांनी मला अण्णांना भेटायचे आहे पण ते शक्य नसले तरी अण्णां लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो, असे ट्विटरवर नमूद केले आहे.

Story img Loader