संतोष भारतीय यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा शुक्रवारी काढला. दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी आपल्या निर्णयाची माहिती दिली.
देशात स्थिर सरकार यावे, यासाठी मी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा देण्याचे ठरवले होते. मात्र, काही झारीतले शुक्राचार्य यामध्ये घुसल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. या झारीतल्या शुक्राचार्यांमुळे ममता बॅनर्जी यांच्याशी ताळमेळ ठेवणेही शक्य झाले नाही. त्यामुळेच आपण ममता बॅनर्जी यांच्या पाठिशी उभे न राहण्याचे ठरविले आहे, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
दिल्लीत रामलीला मैदानावर झालेल्या सभेच्यावेळीही आपली दिशाभूल करण्यात आली. ममता बॅनर्जी यांच्या सभेसाठी तुम्ही या, असे मला निमंत्रण देण्यात आले. तिकडे ममता बॅनर्जी यांना माझ्यासभेसाठी येण्याचे सांगण्यात आले. वास्तविक मी कशाला मुंबईत रामलीला मैदानावर सभा भरवेन. अशा सभेतून मला काय फायदा होणार, असा प्रश्न अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. रामलीला मैदानावर सकाळी अकरा वाजता ही सभा होणार होती. मात्र, बारा वाजले तरी चार हजार लोकही तिथे नव्हते, असे लक्षात
आल्यामुळेच मी सभास्थानी गेलो नाही, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
अण्णा हजारेंचा ममता बॅनर्जी यांना बाय-बाय!
संतोष भारतीय यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप करीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना दिलेला पाठिंबा शुक्रवारी काढला.
First published on: 14-03-2014 at 01:33 IST
TOPICSअण्णा हजारेAnna Hazareलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna hazare withdraws support to mamata banerjee