भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे नेते अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे. मात्र, त्यासाठी नरेंद्र मोदींनी आधी भाजप सोडण्याची अट हजारे यांनी घातल्याचे वृत्त अमोरिकेतील एका वृत्तपत्राने दिले आहे.
अण्णा हजारे दोन आठवड्यांसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. अमेरिकेतील भारतीय समुदायाशी चर्चा करीत असताना २० ऑगस्टला अण्णा हजारे यांनी “मला मोदींना पाठिंबा द्यायला आवडेल”, असे म्हटले आहे. विचारवंत आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अमेरिकेतील भारतीयांनी डेलावेअर येथील हिंदू मंदिरामध्ये या चर्चेचे आयोजन केले होते, असे वृत्त ‘हफिंग्टन पोस्ट’ने दिले आहे.
राजकीय पक्षांवर विश्वास नसल्याचे अण्णा हजारे वारंवार सांगत आले आहेत. मात्र, नरेंद्र मोदींना वैयक्तीक पातळीवर पाठिंबा देणार का? अशी त्यांना अमेरिकेमध्ये विचारणा झाल्यावर त्यांनी मोदींसंदर्भातील मत व्यक्त केले.
“मोदींनी भाजपचे सद्स्यत्व सोडल्यास, अण्णा हजारेंना मोदींना पाठिंबा द्यायला आवडेल”, असे डेलावेअर विद्यापीठातील सहायक प्राध्यापक मुक्तेदार खान यांनी ‘हफिंग्टन पोस्ट’मध्ये लिहिले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2013 रोजी प्रकाशित
भाजप सोडला तरच अण्णांचा मोदींना पाठिंबा
भ्रष्टाचारविरोधी चळवळीचे नेते अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पाठिंबा द्यायचे ठरवले आहे.
First published on: 29-08-2013 at 06:32 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anna ready to endorse modi if he quits bjp report