निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये किंवा मतदार संघात सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने सर्व मुख्य सचिवांना दिले आहेत. ज्या दिवशी सर्वसाधारण निवडणूक किंवा एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणूक असेल तेथील आस्थापने बंद ठेवावीत. तसेच मतदारसंघाबाहेर रोजंदारीवर जे काम करतात त्यांनाही पगारी सुट्टीचा लाभ मिळाला पाहिजे असे आयोगाने स्पष्ट केले आहे. कलम १३५ ब अन्वये एखादा व्यक्ती कोठेही काम करत असेल तरी मतदानाच्या दिवशी त्याला सुटी मिळाली पाहिजे. तसेच सुटी दिली म्हणून त्याच्या वेतनातून पैसे कापू नयेत असे स्पष्ट करण्यात आले आहे. याचा भंग केला तर संबंधित मालकाला पाचशे रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
मतदानादिवशी पगारी सुटी देणे बंधनकारक
निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये किंवा मतदार संघात सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी पगारी सुट्टी देण्यात यावी असे निर्देश निवडणूक आयोगाने सर्व मुख्य सचिवांना दिले आहेत.
First published on: 26-11-2013 at 12:23 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Announce holiday on voting day eci