डेहराडून : उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी त्यांच्या कार्यकाळाची तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त विद्यार्थी, युवक आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी तीन मोठ्या घोषणा केल्या. यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे आणि पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, रोजगाराभिमुख कौशल्यांना चालना देण्यासाठी उच्चस्तरीय समिती, तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्तीसाठी ठोस धोरण आखण्याची घोषणा केली. तसेच राज्यातील १० कोटी रुपयांपर्यंतचे सरकारी प्रकल्प स्थानिक कंत्राटदारांनाच देण्याची घोषणाही त्यांनी केल्या. राजधानीतील परेड ग्राउंडवर आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येत जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी संबोधनादरम्यान मुख्यमंत्र्यांनी प्रादेशिकता आणि जाती-आधारित विभाजनांबद्दलही चिंता व्यक्त केली. तसेच अशा विचारांना प्रोत्साहन देणारे लोक केवळ राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान देणाऱ्या चळवळीतील नेत्यांवरच नव्हे तर त्यांच्या मातृभूमीवरही अन्याय करत असल्याची टीका केली.

तीनवर्षांतील कामगिरीचा उल्लेख

कार्यक्रमादरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गेल्या तीन वर्षातील सरकारच्या कामगिरीचे नियोजनबद्ध पद्धतीने सादरीकरण केले. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ३० हून अधिक नवीन धोरणे आखली असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी अंत्योदय कुटुंबांसाठी तीन एलपीजी सिलिंडर, राज्यातील महिलांसाठी ३० टक्के क्षैतिज आरक्षण, वृद्धापकाळातील पेन्शन लाभ, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आदी उपक्रमांचा विशेषत: उल्लेख केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या ‘तीन वर्षे सेवा, सुशासन आणि विकास’ या पुस्तकाचे प्रकाशन केले.

उत्तराखडंमध्ये बेरोजगारीचा दर घसरला

उत्तराखंडमध्ये बेरोजगारीचा दर लक्षणीयरीत्या ४.४ टक्के पर्यंत घसरला असून जो जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे.

भूमाफियांपासून संरक्षण

सरकार उत्तराखंडच्या पवित्र भूमीचे भू-माफियांपासून संरक्षण करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भिक्षामुक्त १३ मुलांचा सन्मान

देहरादून येथील साधु राम इंटर कॉलेजमधील अतिदक्षता केंद्रात बालभिक्षेतून मुक्त झालेल्या आणि मुख्य प्रवाहातील शिक्षणात प्रवेश मिळवलेल्या १३ मुलांना सन्मानित करण्यात आले.

लखवार बहुउद्देशीय प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या जमीन मालकांना भरपाई म्हणून एकूण १० कोटी रुपये वाटण्यात आले. अटल गृहनिर्माण योजनेअंतर्गत, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना धनादेश आणि घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या. राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा अनेकांना लाभ झाला आणि उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोकसहभाग

यावेळी राज्याच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, कलाकारांनी राज्याच्या समृद्ध वारशाचे दर्शन घडवणारे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुख्य कार्यक्रमापूर्वी, मुख्यमंत्र्यांनी कनक चौक ते परेड ग्राउंडपर्यंतच्या रोड शोमध्ये भाग घेतला आणि विविध प्रदर्शन स्टॉलला भेट दिली.

सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित कार्यक्रम देहरादूनमध्ये आयोजित मुख्य कार्यक्रमाचे सर्व जिल्ह्यांमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले. जिल्हा आणि ब्लॉक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सरकारी कल्याणकारी योजनांचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरोग्य शिबिरे आणि इतर उपक्रम आयोजित करण्यात आले. जिल्हास्तरीय कार्यक्रमांना मंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.