पीटीआय, नवी दिल्ली

विरोधी पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’चे आगामी लोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने राजधानी दिल्लीसह, गुजरात, गोवा व हरियाणात एकत्रित लढण्याची घोषणा शनिवारी केली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

दिल्लीत आम आदमी पक्ष चार तर काँग्रेस तीन जागांवर लढणार आहे. ‘आप’ हा नवी दिल्ली, पूर्व दिल्ली, पश्चिम दिल्ली व दक्षिण दिल्ली या जागा लढवणार आहे. काँग्रेस पक्ष चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि वायव्य दिल्लीत उमेदवार उभे करणार आहे. दिल्लीतील सर्व सातही जागा २०१४ तसेच २०१९ मध्ये भाजपने जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या निवडणुकीत भाजपने काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाच्या एकत्रित मतांपेक्षा अधिक मते सातही जागांवर मिळवली आहेत.

हेही वाचा >>>स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणीऐवजी सत्तास्थापनेकडे लक्ष! पंतप्रधान नरेंद्र मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका

गुजरातमध्ये २६ जागांपैकी काँग्रेस २४ जागांवर, तर आप भरूच तसेच भावनगर येथील जागा लढवणार आहे. गोव्यातील दोन्ही जागा काँग्रेस लढणार असून, चंडीगडची एकमेव जागाही काँग्रेस लढवेल, असे पक्षाचे नेते मुकुल वासनिक यांनी नमूद केले. विशेष म्हणजे आम आदमी पक्षाने दक्षिण गोव्यातून यापूर्वीच आमदार वेंझी वेगीस यांची उमेदवारी जाहीर केली आहे. दक्षिण गोव्यात सध्या काँग्रेसचे खासदार आहेत.हरियाणातील १० पैकी नऊ जागा काँग्रेसच्या वाटय़ाला आल्या असून, कुरुक्षेत्र येथे आप उमेदवार उभा करणार. पंजाबमधील १३ जागांवर मात्र हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार आहेत.

भरूचसाठी काँग्रेस आग्रही

भरूच येथील जागेसाठी काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे पुत्र फैझल आग्रही होते. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते ‘आप’ला पाठिंबा देणार नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले होते.

भाजप निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात डांबत आहे. शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. महागाई देखील वाढली आहे. – संदीप पाठक, नेते, आम आदमी पक्ष

एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे काँग्रेस व आप एकत्र आल्याचे पाहून दिल्लीच्या जनतेला धक्का बसला आहे. कुणीही आघाडी केली तरी दिल्लीतील सर्व सातही जागा भाजप जिंकेल. – वीरेंद्र सचदेवा, अध्यक्ष, दिल्ली भाजप

जागावाटप

’दिल्ली एकूण जागा : ७

आप : ४, काँग्रेस : ३

’गुजरात  एकूण जागा : २६

काँग्रेस : २४, आप :२

’हरियाणा एकूण जागा : १०

काँग्रेस : ९, आप : १

Story img Loader