विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील वातावरण तापताना दिसत आहे. सोमवारी पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याची एक कथित सेक्स सीडी समोर आली होती. यानंतर आता हार्दिक पटेलची आणखी एक कथित सीडी व्हायरल झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये दोन सीडी समोर आल्याने हार्दिकसमोरील अडचणी वाढल्या आहेत. हा व्हिडिओ २२ मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ‘लोकसत्ता’ने या व्हायरलची पडताळणी केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आज व्हायरल झालेल्या कथित सीडीमधील व्हिडिओमध्ये हार्दिक पटेल असल्याचा दावा केला जात आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये त्याचा एक मित्र आणि एक तरुणी असल्याचे दिसत आहे. याआधी काल समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हार्दिक एका तरुणीसोबत असल्याचा दावा करण्यात आला होता. हार्दिकची कालची कथित सीडी अश्विन सांकडसरिया यांनी समोर आणली होती. या व्हिडीओमधील व्यक्ती हार्दिक पटेल असून, त्याच्यासोबत एक महिलाही असल्याचा दावा सांकडसरिया यांनी केला होता. मात्र हा व्हिडीओ खोटा असल्याचे हार्दिकने सांगितले होते.

हार्दिक पटेलने व्हायरल झालेली सीडी चुकीची असल्याचे ४ दिवसांमध्ये सिद्ध करुन दाखवावे, असे आव्हान अश्विन सांकडसरिया दिले आहे. ‘हार्दिकच्या सीडीची न्यायवैद्यक चाचणी करण्यात यावी,’ अशी मागणीही त्यांनी केली. ‘काँग्रेसने १८२ जागांवर उमेदवार देताना हार्दिक पटेलचे मत विचारात घेतले जाईल, असे म्हटले होते. त्यामुळे नाराज झालेले काँग्रेसमधील काही लोकच अशाप्रकारे सीडी व्हायरल करत आहेत,’ असेही सांकडसरिया यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले.