LPG Price Hike: देशातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा सामना करावा लागणार आहे. कारण आता घरगुती सिलेंडरचे (Domestic Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी महाग झाले आहेत. शनिवारी तेल कंपन्यांद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरचा (LPG Gas Cylinder) भाव ५० रुपयांनी वाढवण्यात आला आहे. यासोबतच आता मुंबईत १४.२ किलोंचा सिलेंडर ९९९.५० म्हणजेच जवळपास १००० रुपयांना मिळणार आहे. तर दिल्लीतही ९९९.५० रुपयांना गॅस मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मार्च २०२२ मध्येही सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्याच वेळी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत गेल्या आठवड्यात १०२ रुपयांनी वाढ करण्यात आली होती, त्यानंतर त्याची किंमत २२५३ रुपये करण्यात आली होती. सर्वसामान्य नागरिक पेट्रोल आणि डिझेलच्या महागाईचा सामना करत असताना एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. आता एलपीजीच्या वाढलेल्या किमतीही सर्वसामान्यांचा खिसा रिकामी करण्यासाठी पुरेशा आहेत.

१ मे रोजी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत १०२.५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत २३५५.५० रुपयांवर पोहोचली. त्याचबरोबर ५ किलोच्या एलपीजी गॅस सिलेंडरची किंमतही ६५५ रुपयांवर पोहोचली आहे.

यापूर्वी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती २,२५३ रुपये करण्यात आल्या. त्याच वेळी, १ मार्च रोजी, व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली. देशातील सर्वसामान्य जनता सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे हैराण झाली आहे. दरम्यान, एलपीजी गॅस सिलिंडरची महागाई त्यांना आणखी त्रासदायक ठरणार आहे.