जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात आणखी एक रहस्यमय स्फोट झाला आहे. बस स्थानकात उभ्या असलेल्या बसमध्ये गुरुवारी सकाळी हा स्फोट झाला. गेल्या आठ तासातील अशा प्रकारचा हा दुसरा स्फोट आहे. सुदैवाने, या स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाही. जम्मू काश्मीर पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
बुधवारी रात्री १० वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास अशाच प्रकारचा स्फोट झाला होता. डोमेल चौकातील बसमध्ये झालेल्या या स्फोटात दोघे जखमी झाले होते. येथून फक्त चार किमी अंतरावर असणाऱ्या ठिकाणी दुसरा स्फोट झाला आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.
First published on: 29-09-2022 at 08:50 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another mysterious blast in parked bus in udhampur jammu kashmir sgy