नौदल कमांडच्या जहाज निर्मिती केंद्रात बांधणी सुरू असलेल्या अणू पाणबुडीत झालेल्या अपघातात एक कर्मचारी ठार तर दोन जण जखमी झाले आहेत. जहाजनिर्मिती केंद्रातील भवन – ५ मध्ये अरिहंत श्रेणीतील पाणबुडीतील हायड्रॉलिक टँकमधील दाबाची तपासणी केली जात असताना ही दुर्घटना घडल्याचे संरक्षण संशोधन विकास संघटनेचे प्रमुख अविनाश चंदर यांनी सांगितले. पाणबुडीवर उच्चदाब चाचणी करण्यात येत असताना झालेल्या या अपघातामुळे या प्रकल्पासाठी काम करत असलेला एक नागरी कंत्राटदार ठार झाला. नौदलाच्या पूर्व कमांडचे मुख्यालय असलेल्या विशाखापट्टणम येथे ही पाणबुडी बांधण्यात येत आहे.
दरम्यान, शुक्रवारी मुंबईतील माझगाव डॉकयार्डमधील आयएनएस कोलकाता या युध्दनौकेला गॅस गळती झाल्याने आणि कार्बन डॉयऑक्साईडचा गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने कमांडर दर्जाच्या अधिका-याचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही तासांचा अवधी लोटत नाही तोच पुन्हा एकदा नौदलातील युध्दनौकेवर अपघात झाल्याने प्रश्नचिन्ह उपस्थि केले जात आहे.

Story img Loader