नवी दिल्ली/अमृतसर : पाकिस्तानमधून भारतीय हद्दीत घुसलेले ‘ड्रोन’ पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) पाडल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. फिरोजपूर क्षेत्रामधील हरभजन सीमा चौकीजवळ बुधवारी रात्री आठच्या सुमारास गोळीबार करून हे ‘ड्रोन’ पाडण्यात आले. दरम्यान, दाट धुक्याचा गैरफायदा उठवत येथे ‘ड्रोन’द्वारे अमली पदार्थ-शस्त्रास्त्रे भारतीय हद्दीत पोहोचवण्याचे प्रयत्न तस्करांनी वाढवले आहेत. या पार्श्वभूमीवर सीमाभागात भारतीय सुरक्षादलांकडून विशेष दक्षता बाळगली जात आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बीएसएफच्या जवानांनी ‘ड्रोन’ला लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. ‘बीएसएफ’ प्रवक्त्याने सांगितले, की गुरुवारी सकाळी या भागात शोध घेतला असता शेतात एक ड्रोन कोसळलेला आढळला. याद्वारे शस्त्रे अथवा अमली पदार्थ परिसरात टाकण्यात आले अथवा नाही, याचा शोध सुरू आहे. चंडीगढ : दाट धुक्याच्या आच्छादनाचा गैरफायदा घेत ‘ड्रोन’द्वारे अमली पदार्थ आणि शस्त्रास्त्र तस्करीचे प्रयत्न वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन ‘बीएसएफ’कडून पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ विशेष सतर्कता बाळगण्यात येत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दिवसांपासून सीमा भागात ‘ड्रोन’द्वारे तस्करीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तपासणी नाक्यांवरील गस्त वाढवण्यात आली आहे. ‘बीएसएफ’ जवान अधिक दक्षतेने गस्त घालत आहे. गेल्या वर्षभरात भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे दोनशेपेक्षा जास्त ‘ड्रोन’चा वावर नोंदवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Another pak drone shot down by bsf at india pakistan border zws