पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी होळीनिमित्त देशबांधवांना शुभेच्छा बहाल केल्या आहेत.
देशभर साजरा होणारा हा उत्सव आहे. होळी हा रंगांचा उत्सव असून त्यातून भारतातील विविधता एकतेत बांधली जाते. जात, धर्म, पंथाचा विचार न करता सर्वजण या उत्सवात आनंदाने सामील होत एकतेचे प्रदर्शन करतात. म्हणून विविधतेत एकता आणणाऱ्या होळीच्या शुभेच्छांचा संदेश अन्सारी यांनी दिला.
 पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना ट्विटद्वारे शुभेच्छा दिल्या असून त्या त्यांनी जीवनात आनंदाचा रंग भरणाऱ्या होळीच्या शुभकामना म्हटले आहे.

Story img Loader