‘सभागृहाचे कामकाज सुरळीत चालावे याची जबाबदारी तुमची आहे, तुम्ही सभागृहात दुपारी बारा नंतर उपस्थित नसता, त्यानंतर सभागृहात कामकाज होत नाही, असे गेले काही दिवस अनुभवास येत आहे, अशी टीका करीत बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी बुधवारी उपराष्ट्रपती व राज्यसभेचे सभापती हमीद अन्सारी यांना लक्ष्य केले. सोडत पदोन्नतीतील आरक्षणासंबंधीच्या विधेयकावरील चर्चा राज्यसभेत हेतूपुरस्सर हाणून पाडली जात असल्याने त्या भडकल्या. त्यांच्या टीकास्त्राने सुरळीतपणे चाललेला प्रश्नोत्तराचा तास अनपेक्षितपणे संपुष्टात आला. त्यांच्या संतापाचे पडसाद लोकसभेतही उमटले आणि दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार तहकूब होऊन शेवटी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.   

Story img Loader