नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारने २०२४ साठी दोन शालेय कॅलेंडर जारी केले आहे. यामुळे, बिहारमध्ये वाद निर्माण झाला आहे. उर्दू माध्यम शाळा आणि इतर माध्यमातील शाळांसाठी स्वतंत्र सुट्ट्यांची यादी तयार केल्याने भाजापने बिहार राज्य सरकारवर खरपूस टीका केला आहे.

बिहार राज्याच्या शिक्षण विभागाने जारी केलेल्या कॅलेंडरनुसार २०२४ मध्ये शिवरात्री, जन्माष्टमी, रक्षाबंधन, हरतालिका आणि जितिया (जीवितपुत्रिका व्रत) यांसारख्या सणांना सुट्टी मिळणार नाही. तर, उर्दू माध्यमांच्या शाळांना ईद-उल-फित्र आणि ईद-उल-अधा (बकरीद) साठी तीन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. परंतु, उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना दोन्ही ईदच्या सणांना फक्त एक दिवस सुट्टी असेल.

Maharashtra Assembly Election 2024 Updates in Marathi
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : “प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंना बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये जाण्यास रोखलं”, सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप!
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Jitu Patwari said cm Shivraj Singh launched Ladli Behan Yojana but payments in mp irregular
‘लाडक्या बहिणींना रक्कम नियमित मिळणार का? कारण मध्य प्रदेशात…’
vidhan sabha elections school holiday
राज्यात १८, १९ नोव्हेंबरला शाळांना सुटी नाही… काय आहे शिक्षण आयुक्तांनी दिलेले स्पष्टीकरण?
Sanjay Kelkar and Sanjay Bhoir of Mahayuti reunion in Thane city
संजय केळकर आणि संजय भोईर यांचे मनोमिलन; ठाणे शहरात महायुतीमधील नाराजी अखेरच्याक्षणी दूर
daughter cannot claim property if father dies before Hindu right of succession takes effect
हिंदू वारसा हक्क अंमलात येण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू, मुलीला मालमत्तेवर हक्क सांगता येणार नाही

या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना सुशील मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, “नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार सरकारने हिंदूविरोधी चेहरा दाखवून हिंदूंच्या भावना दुखावणारा निर्णय घेतला आहे. हिंदूंच्या सणांच्या सुट्ट्यांमध्ये कपात करण्यात आली आहे. मुस्लिम सणांच्या सुट्ट्या वाढवल्या आहेत.

केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह म्हणाले की, “इस्लामिक रिपब्लिक ऑफ बिहार. नितीश आणि लालू सरकारने शाळांमध्ये मुस्लिम सणांच्या सुट्ट्या वाढवल्या पण हिंदू सणांच्या सुट्ट्या संपवल्या. लालू यादव आणि नितीश सरकार ज्या प्रकारे हिंदूंवर हल्ले करत आहेत, भविष्यात ते मोहम्मद नितीश आणि मोहम्मद लालू म्हणून ओळखले जातील”, त्यांनी X वर लिहिले.

राज्याच्या शिक्षण विभागाने २७ नोव्हेंबर रोजी उर्दू माध्यमाच्या शाळा आणि उर्दू माध्यम नसलेल्या शाळांसाठी कॅलेंडर जारी केले. राज्याच्या शिक्षण विभागाच्या म्हणण्यानुसार, शिक्षणाच्या अधिकारांतर्गत किमान २२० अध्यापन दिवस सुनिश्चित करून हे कॅलेंडर तयार करण्यात आले. उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये दर शुक्रवारी सुट्टी असेल आणि मोहरमसाठी दोन दिवसांची सुट्टी देण्यात आली आहे. मात्र, उर्दू माध्यम नसलेल्या शाळांना ही केवळ एक दिवसाची सुट्टी आहे. दिवाळीसाठी एक दिवस, होळीसाठी दोन दिवस आणि दुर्गापूजा आणि छठपूजेसाठी प्रत्येकी तीन दिवस सुट्टी असते.

यंदाच्या शाळेच्या कॅलेंडरमध्ये हरतालिकेला दोन दिवस आणि जितियाला एक दिवस सुट्टी होती. मात्र, या सुट्ट्या २०२४ मध्ये मिळणार नाहीत. तसेच, बिहारच्या शिक्षण विभागाने उर्दू माध्यमाच्या शाळा आणि उर्दू नसलेल्या शाळांसाठी स्वतंत्रपणे दोन कॅलेंडर जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.