करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अधिकाधिक प्रभावी औषधी वापरण्यावर भर दिला जात असून, यात आता एका औषधाची भर पडली आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोना झाल्यानंतर वापरण्यात आलेलं औषध भारतातही उपलब्ध झालं आहे. ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ असं या औषधाचं नाव असून, केंद्र सरकारने याला परवानगी दिली आहे. त्यामुळे करोना रुग्ण एका आठवड्यात बरा होऊ शकतो. हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. नागेश्वर रेड्डी यांनी ही माहिती दिली आहे. इंडिया टुडेनं याबद्दलची वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारात ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ उपचार पद्धतीचा वापर करण्यात आला होता. ट्रम्प यांच्यावर वापरण्यात आल्यानंतर हे औषध चर्चेत आलं होतं. त्यानंतर आता भारत सरकारनंही याच्या वापराला परवानगी दिली असून, हैदराबादमधील एआयजी रुग्णालयाचे अध्यक्ष डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी विषयी महत्त्वाची माहिती दिली.

एआयजी रुग्णालयाने ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’चा उपचारात वापर करणं सुरू केलं आहेत. त्याचबरोबर नव्या म्युटेशनवर ते किती प्रभावी आहे, यावरही व्यापक स्वरूपात अभ्यासही केला जात आहे, असं रेड्डी म्हणाले. “या औषधाच्या वापरामुळे करोना रुग्ण एका आठवड्यातच आरटी-पीसीआर टेस्ट निगेटिव्ह होऊ शकतो. करोनाच्या डबल म्युटेशनवर ‘अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल’ किती प्रभावी आहे, याचा आम्ही एआयजीमध्ये अभ्यास करत आहोत,” असं रेड्डी म्हणाले.

“अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटलच्या परिणामाबद्दलचे पुरावे अद्याप स्थापित होऊ शकलेले नसले, तरी न्यू इंग्लड जर्नल ऑफ मेडिसिनसह विविध जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या परीक्षण उत्साहवर्धक आहेत. अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटलमुळे रुग्णाला रुग्णालयात भरती करण्याची वा मृत्यूची शक्यता ७० टक्क्यांनी कमी होते,” असं रेड्डी म्हणाले. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर उपचारासाठी अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल औषध वापरण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चर्चा सुरू झाली. या उपचारपद्धतीमुळे रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्याची शक्यता ७० कमी होते. अ‍ॅण्टीबॉडी कॉकेटल हे दोन वेगळ्या अ‍ॅण्टीबॉडीपासून तयार करण्यात आलेलं असून, प्रयोगशाळेत विकसित करण्यात आलेलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Antibody cocktail treatment for covid 19 antibody cocktail shot former us president donald trump bmh